AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत 30 ते 40 कुत्र्यांवर बलात्कार, निर्लज्ज आरोपी म्हणतो प्राण्यांना आक्षेप नाही, तर गुन्हा कसा?

अहमद शाहीने कुत्र्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उमटली होती. (Ahmad Shahi raped dogs in Mumbai)

मुंबईत 30 ते 40 कुत्र्यांवर बलात्कार, निर्लज्ज आरोपी म्हणतो प्राण्यांना आक्षेप नाही, तर गुन्हा कसा?
आरोपी अहमद शाही
| Updated on: Mar 16, 2021 | 12:54 PM
Share

मुंबई : कुत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मुंबईतील 68 वर्षीय वृद्धाने धक्कादायक दावे केले आहेत. जर मुक्या प्राण्यांना काही आक्षेप नसेल, तर तो गुन्हा होत नाही, असं निर्लज्ज उत्तर अहमद शाहीने (Ahmad Shahi) दिलं. आरोपी अहमद शाहीने आतापर्यंत 30 ते 40 कुत्र्यांना आपल्या विकृतीचे शिकार केल्याची भीती आहे. (Ahmad Shahi man who raped 30 to 40 dogs in Mumbai arrested)

सोशल मीडियावर संताप

अहमद शाहीने कुत्र्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उमटली होती. सोशल मीडियावरही #SorrySheru हा हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये आला. अहमदला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून आणखी धक्कादायक खुलासे झाले. त्याने आतापर्यंत 30 ते 40 कुत्र्यांवर बलात्कार केल्याचा संशय आहे.

खाण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार

अहमद हा मुंबईतील जुहू गल्ली भागातील रहिवासी आहे. पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास तो हे भयंकर कृत्य करत असे. अहमद भाजी विक्रेता आहे. कुत्र्या-मांजरांना खाण्याच्या बहाण्याने तो जवळ बोलवत असे. त्यानंतर मुक्या प्राण्यांवर लैंगिक अत्याचार करत असे.

“मुक्या प्राण्यांना आक्षेप नाही”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्राण्यांना खायला देऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याची कबुली आरोपी अहमदने चौकशीदरम्यान दिली. जर मुक्या प्राण्यांना काही आक्षेप नसेल, तर तो गुन्हा होत नाही, असं लंगडं समर्थन अहमदने दिलं. ‘बॉम्बे अॅनिमल राईट्स’ या एनजीओतील 45 वर्षीय प्राणी हक्क कार्यकर्ते विजय मोहनानी यांच्या तक्रारीनंतर डीएन नगर पोलिसांनी अहमदला अटक केली. (Ahmad Shahi man who raped 30 to 40 dogs in Mumbai arrested)

हीन कृत्याचा व्हिडीओ

तक्रारदार विजय मोहनानी यांना अहमदच्या कृत्याविषयी फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने अहमद कुत्र्यांवर बलात्कार करत असल्याचा दावा केला. त्याच्याकडे पुरावे मागितले असता त्याने व्हिडीओ पाठवला. डिसेंबर 2020 मधील हा व्हिडीओ पाहून मोहनानी हादरले. हा व्हिडीओ त्यांनी डीएन नगर पोलिसांना दिला.

‘बॉम्बे अॅनिमल राईट्स’ एनजीओतील कार्यकर्ते जुहू परिसरातील कुत्र्यांची वैद्यकीय तपासणी करत आहेत. अत्याचार झालेल्या कुत्र्यांची यादी पोलिसांना सोपवली जाणार आहे. भूतदया नसलेल्या आरोपी अहमद शाहीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

संबंधित बातम्या :

4 नराधमांचा कुत्र्यावर गँगरेप, उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू

मुंबईत विकृतीचा कळस, चौघांचा कुत्र्यावर गँगरेप

(Ahmad Shahi man who raped 30 to 40 dogs in Mumbai arrested)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.