AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहा महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, क्षुल्लक वादातून पतीकडून नवविवाहितेची हत्या

किशोर साळवे याचा सहा महिन्यांपूर्वी नेहासोबत प्रेम विवाह झाला होता. शंकर आणि नेहा यांच्यात घरगुती कारणातून क्षुल्लक वाद झाला. (Ahmednagar wife murder by Husband)

सहा महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, क्षुल्लक वादातून पतीकडून नवविवाहितेची हत्या
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Mar 10, 2021 | 12:34 PM
Share

अहमदनगर : घरगुती वादातून नवविवाहितेची हत्या झाल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये उघडकीस आला आहे. क्षुल्लक वादातून पत्नीला मारहाण करुन पतीने तिचं डोकं भिंतीवर आपटलं. यामध्ये नवविवाहितेला प्राण गमवावे लागले. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Ahmednagar Newly wed wife murder by Husband)

भिंतीवर डोकं आपटून पत्नीची हत्या

किशोर साळवे याचा सहा महिन्यांपूर्वी नेहासोबत प्रेम विवाह झाला होता. शंकर आणि नेहा यांच्यात घरगुती कारणातून क्षुल्लक वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन शंकरने पत्नी नेहाला जबर मारहाण केली आणि तिचं डोकं भिंतीवर आपटलं. यामध्ये नेहाचा मृत्यू झाला. पत्नी नेहा साळवे यांच्या मृत्यूनंतर आरोपी किशोर साळवे याच्याविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी किशोरला अटक केली आहे.

महिला दिनीच विरारमध्ये पत्नीकडून पतीची हत्या

विरारमध्ये पत्नीने पतीच्या पोटात चाकू खुपसून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघड झाली होती. 29 वर्षीय नेहा पवार  असे या आरोपी महिलेचे नाव आहे. तर लोकेश जगदीश पवार (वय 30) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. या दोघांचा प्रेमविवाह झालेला असून त्यांना एक 8 वर्षांचा मुलगाही आहे. ते विरार पूर्व मकवाना कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील जीवदानी अपार्टमेंटमध्ये राहत होते.

रविवारच्या पहाटे साडेतीनच्या सुमारास पती कामावरून घरी आल्यानंतर या दोघात घरगुती कारणावरून वाद झाले. याच वादातून पत्नीने चक्क धारदार चाकू पतीच्या पोटात खुपसून त्याची निर्घृणपणे हत्या केली.

अनैतिक संबंधातून नागपुरात नवविवाहितेची हत्या

अनैतिक सबांधामुळे निर्माण झालेल्या वादातून पतीने नवविवाहित पत्नीची गळा आवळून ह्त्या केल्याचं महिन्याभरापूर्वी समोर आलं होतं. दीप्ती अरविंद नागमोती आणि आरोपी अरविंद नागमोती यांचं लग्न हत्येच्या सुमारे सव्वा महिने आधी झालं होतं. पतीच्या अनैतिक संबंधांची कुणकुण लागल्याने जाब विचारणाऱ्या पत्नीची पतीने हत्या केली होती.

संबंधित बातम्या :

आधी प्रेमविवाह, आठ वर्षांचा मुलगाही, तरीही भल्या पहाटे क्षुल्लक कारणावरुन पतीची निर्घृण हत्या

महिनाभरापूर्वी लग्न, विवाहबाह्य संबंधांचा संशय, दोन नववधूंची पतीकडून हत्या

(Ahmednagar Newly wed wife murder by Husband)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.