Video: नाशिक पोलीसांचं चाललंय काय? चौकीतच पोलीसांची ओली पार्टी, लोकांनी धडक देताच पळापळ

Video: नाशिक पोलीसांचं चाललंय काय? चौकीतच पोलीसांची ओली पार्टी, लोकांनी धडक देताच पळापळ
पार्टी सुरु असल्यचे समजल्यानंतर नागिकांचा पोलिस चौकीबाहेर जमाव
Image Credit source: tv9 marathi

नाशिकच्या (Nashik) एका पोलिस चौकीत ओली पार्टी रंगली असल्याची व्हिडीओत (video) स्पष्ट दिसत आहे. फोटो आणि व्हिडीओ काढणाऱ्या नागरिकांना मद्यपी पोलिसांनी (nashik police) मारहाण केली आहे.

चंदन पुजाधिकारी

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 16, 2022 | 9:26 AM

नाशिक – नाशिकच्या (Nashik) एका पोलिस चौकीत ओली पार्टी रंगली असल्याची व्हिडीओत (video) स्पष्ट दिसत आहे. फोटो आणि व्हिडीओ काढणाऱ्या नागरिकांना मद्यपी पोलिसांनी (nashik police) मारहाण केली आहे. घटनास्थळी नागरिक जमत असल्याचे लक्षात आल्यानंतर मद्यपी पोलिसांनी तिथून पळ काढला आहे. ही घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डी. के. नगर पोलीस चौकीत उघडकीस आली आहे. दारू पिऊन टवाळखोर त्रास देत असल्याने त्यांची तक्रार करण्यासाठी नागरिक पोलिसांकडे गेले होते. मात्र पोलिसचं दारू पिताना आढळून आल्याने तक्रारदाराला धक्का बसला. तक्रारदाराने मोबाईल काढून शुटिंग सुरू करताच पोलिसांनी तक्रारदाराला मारहाण देखील केली आहे. सदर घटनेची परिसरात कुणकुण लागताच अनेक नागरिक डी. के. नगर पोलीस चौकी समोर जमा झाले होते. वरिष्ठ पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.


पहिल्या व्हिडीओमध्ये काय आहे

हे बघा सर…तो पोलिस पळून राहिला. ये एक मिनिटं…(तेवढ्यात पोलिस चौकीपासून पळत असताना दिसतोय) जी व्यक्ती व्हिडीओ तयार करीत आहे. ती मोटारसायकल सुरू करते आणि पोलिसाचा पाठलाग करते. एक मिनिट ओ दादा, पळू नका की…ए थांब ये गाडी थांबवं की…एक मिनिट ओ दादा..शुक शुक..मोटार सायकल चालवणारा तरूण शिवी देतो…कुठवर पळतंय पळू दे…तू मारलं का यांना…कोणाला मारलं…तू चल माझ्यासोबत पोलिस स्टेशनला…पळू नको तू…दारू पिऊन पळू राहिला काय…काय नाव काय तुझं…ओ हवालदार नाव काय तुमचं…तुम्ही कोण…ये गप्प बस्सं…कोणाला बोलून राहिला तू…मी पत्रकार आहे…नाना बसा…तू कोणाशी बोलून राहिला…बसा बसा गाडीव बसा…पळून राहिला का तू…तूझी मेडिकल करतो…थांब सीपीला फोन लावतो…

पार्टी सुरू असल्याचा फोटो व्हायरल

दुसरा व्हिडीओ

एक मिनिटं ओ, बोला…बोला..कमिशनर साहेबांना फोन केलाय..हे बघा सर फोडलंय माझं पोलिसांनी…कोण हाय ड्युटीला कोण हाय…हे बघ…नाय नाय, सगळे फोटो घेतले आहेत. व्हिडीओ लाईव्ह झालंय…बोला पटकन बोला…नाही नाही…बोलून घ्या…

पोलिसांच्यावर कारवाई काय होणार 

नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डी.के.नगर पोलीस चौकीतील असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता ओली पार्टी करणाऱ्या पोलिसांच्यावरती वरीष्ठांकडून कोणती कारवाई केली जाईल हेही पाहावं लागेल.

कसोटी मालिका खेळण्याचा प्रशिक्षक-कर्णधाराच्या मागणीला द. आफ्रिकन खेळाडूंकडून केराची टोपली, IPL ला प्राधान्य

जागेच्या वादातून रक्तरंजित थरार, चौघांची निर्घृण हत्या, सहा जण गंभीर

तुमचा ‘द काश्मीर फाईल्स’ तर आमचे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रवादीच्या नव्या मागणीनं सरकारची गोची?

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें