AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Leopard Attack : बिबट्याचा संपुर्ण कुटुंबियावर हल्ला, पत्नीच्या धाडसामुळे पती आणि मुलीचे बचावले, पण…

अचानक एक बिबट्या त्यांच्या झोपडीत शिरला आणि पप्या पवार यांच्यावर हल्ला जोरदार हल्ला केला. त्यावेळी झोपेत गोंधळलेल्या पप्याने प्रतिकार केला, परंतु तो अपुरा पडला.

Leopard Attack : बिबट्याचा संपुर्ण कुटुंबियावर हल्ला, पत्नीच्या धाडसामुळे पती आणि मुलीचे बचावले, पण...
Image Credit source: Google
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 24, 2023 | 12:28 PM
Share

निनाद करमरकर, अंबरनाथ : अंबरनाथ (Ambernath) तालुक्यातील मलंगगड परिसरात (Malanggad) बिबट्या मध्यरात्री एका झोपडीत शिरला. बिबट्याने (Leopard Attack) तात्काळ पतीवरती हल्ला करायला सुरुवात केली, त्यावेळी बिबट्या आणि पती यांच्यात जोरदार झटापट सुरु झाली. झोपडीतील झटापट इतकी जोरात होती की, शेजारी असलेल्या पत्नीला जाग आली. धाडसी पत्नीने पहिल्यांदा हातात मोठी काठी घेतली. त्यानंतर काहीवेळी झोपडीत संघर्ष झाला.

मलंगगड परिसरातील जकात नाका भागात पप्प्या बाळ्या पवार हे पत्नी सखू आणि लहान मुलीसह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी पहाटे हे कुटुंब त्यांच्या झोपडीत झोपलेलं होतं. त्यावेळी अचानक एक बिबट्या त्यांच्या झोपडीत शिरला आणि पप्या पवार यांच्यावर हल्ला जोरदार हल्ला केला. त्यावेळी झोपेत गोंधळलेल्या पप्याने प्रतिकार केला, परंतु तो अपुरा पडला.

या गोंधळाने जागा झालेल्या सखुबाईने त्वरित मुलीला बाजूला घेत हातात काठी घेऊन बिबट्याचा हिमतीने प्रतिकार केला. बिबट्याला पळवून लावलं. मात्र बिबट्याशी झालेल्या झटापटीत तिचा पती पप्या हा जखमी झाला आहे. यानंतर त्याला तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.पतीच्या चेहऱ्याला बिबट्याच्या हल्ल्यात जखमा झाल्या असून त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सखुबाई पवार यांनी धाडसाने बिबट्याला पळवून लागल्याने त्यांचं सगळीकडे कौतूक होतं आहे.

Follow Us
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी