AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादमध्ये जमिनीचा वाद, होमगार्ड महिलेला नग्न करुन मारहाण

औरंगाबाद: औरंगाबाद तालुक्यातील सिल्लोडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेला नग्न करुन जबर मारहाण करण्यात आली. अंगावर कपडे नसल्याने ग्रामस्थ त्या महिलेला झाकण्याचा प्रयत्न करत असताना, आरोपींनी ग्रामस्थांना पिटाळून लावले. धक्कादायक म्हणजे पीडित महिला सिल्लोड ग्रामीण पोलीसमध्ये होमगार्ड म्हणून काम करते. 1200 स्क्वेअर फूट जागेसाठी हा धक्कादायक प्रकार घडला. पीडित महिलेच्या आईच्या नावावर […]

औरंगाबादमध्ये जमिनीचा वाद, होमगार्ड महिलेला नग्न करुन मारहाण
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

औरंगाबाद: औरंगाबाद तालुक्यातील सिल्लोडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेला नग्न करुन जबर मारहाण करण्यात आली. अंगावर कपडे नसल्याने ग्रामस्थ त्या महिलेला झाकण्याचा प्रयत्न करत असताना, आरोपींनी ग्रामस्थांना पिटाळून लावले.

धक्कादायक म्हणजे पीडित महिला सिल्लोड ग्रामीण पोलीसमध्ये होमगार्ड म्हणून काम करते. 1200 स्क्वेअर फूट जागेसाठी हा धक्कादायक प्रकार घडला. पीडित महिलेच्या आईच्या नावावर असलेल्या जागेवर तिच्या चुलत्यांचा डोळा असल्याचा आरोप आहे. त्यामुळे पीडित महिला आणि तिच्या वयोवृद्ध आईला, जागेवरून पिटाळून लावण्यासाठी आरोपी धनंजय वाघ, मुरलीधर वाघ, बाबूराव वाघ, रामदास वाघ यांनी पीडितेला नग्न करून मारहाण केली.

आरोपींचा नातेवाईक सिल्लोड पोलीस ठाण्यात असल्याने आरोपींवरील कारवाईस टाळाटाळ होत असल्याचा आरोप पीडित महिलेचा आहे.  मात्र या सर्वप्रकाराने सिल्लोडसह औरंगाबाद हादरुन गेलं आहे.

एका महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याने या राज्यात कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे की नाही असा प्रश्न आहे. याप्रकरणी आरोपींच्या मुसक्या कधी आवळणार हा खरा प्रश्न आहे.

Follow Us
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?.
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?.
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.