
लग्नानंतरही अनेक कपल आपल्या जोडीदाराला धोका देतात. विवाहबाह्य संबंधांच्या बातम्या सतत कानावर येत असतात. असच एक प्रकरण बिहारच्या अररियामधून समोर आलय. एका विवाहित महिलेच आपल्याच दीरासोबत अफेअर सुरु होतं. मागच्या 9 वर्षांपासून ती पतीला धोका देत होती. अनेकदा दीरासह नेपाळला हनिमूनला जायची. पण यावेळी तिला नशिबाने दगा दिला.
नवऱ्याला जसं समजलं, त्याची पत्नी मोठ्या भावासोबत हॉटेलमध्ये आहे. तो तात्काळ नेपाळला गेला. तिथे जाऊन त्याने पत्नी आणि स्वत:च्या भावाला अय्याशी करताना पकडलं. खूप गोंधळ झाला. मग परत येऊन त्याने पोलिसात तक्रार नोंदवली. “साहेब, पाणी आता डोक्यावरुन गेलय. यांच्याविरोधाता कारवाई करा. माझ्या पत्नीला आमच्या मुलीची सुद्धा दया आली नाही. परपुरुषासोबत तिचे अनैतिक संबंध आहेत” असं पीडित पतीने सांगितलं.
दोघांनी मिळून पतीला मारलं
त्यानंतर फारबिसगंज पोलिसांनी दोन्ही आरोपींना पोलीस ठाण्यात आणलं. दोघांकडून एक बॉन्ड लिहून घेतला. कोहलिया पंचायतच हे प्रकरण आहे. इथे राहणाऱ्या एका युवकाच्या पत्नीचे त्याच्याच मोठ्या भावासोबत अनैतिक संबंध होते. काही वर्षांपासून हे अफेअर सुरु होतं. एकवर्षापूर्वी युवकाने या प्रकरणात फारबिसगंज पोलीस ठाण्यात लिखित अर्ज दिला. त्यात त्याने पत्नीचे आपल्या मोठ्या भावासोबत संबंध असून दोघांकडून मारहाण झाल्याचा आरोप केला होता. लिखित अर्ज दिल्यानंतर युवकाला त्याचा मोठा भाऊ आणि पत्नीने मिळून मारहाण केली होती. पत्नीने उलट पती विरोधात अर्ज देऊन कारवाईची मागणी केली होती.
दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं
पीडित युवकाने सांगितलं की, “मी त्यांना अडवलं, त्यावेळी माझा भाऊ आणि पत्नीने मिळून मला मारहाण केली. मी दोघांना प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला. पण दोघे सुधरले नाहीत. आम्हाला सात वर्षांची मुलगी आहे. मी तिला मुलीची शपथ दिली. तू एका मुलीची आई आहेस, सुधर असं तिला सांगितलं. पण तिच्यावर काही परिणाम झाला नाही. माझा भाऊ आणि माझी पत्नी दोघे अनेकदा हनीमूनसाठी नेपाळला जायचे. यावेळी मला समजल्यानंतर मी तिथे गेलो. हॉटेलमध्ये मी दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं. दोघांना शिक्षा व्हावी अशी माझी मागणी आहे” पोलिसांनी सांगितलं की, वैध कागदपत्र दाखवून दोघे हॉटेलमध्ये उतरले होते.