Love Marriage : प्रेम आंधळं असतं, ग्रॅज्युएट झालेल्या मुलीने अशा मुलाशी लग्न केलं, जो…

Love Marriage : एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यात एक मुलगी मुलासोबत लग्न करताना दिसतेय. मुलीच्या आई-वडिलांनी तिच्यासाठी मुलगा निवडल होता, पण...

Love Marriage : प्रेम आंधळं असतं, ग्रॅज्युएट झालेल्या मुलीने अशा मुलाशी लग्न केलं, जो...
Love Marriage
Image Credit source: social media
| Updated on: May 29, 2025 | 2:17 PM

प्रेम आंधळं असतं…हे वाक्य आतापर्यंत अनेकांनी ऐकलं आहे. प्रेमात पडलेल्या माणसाला चुकीचही बरोबर वाटतं. बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये असच एक प्रकरण समोर आलय. एका ग्रॅज्युएट झालेल्या मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन 8 वी फेल बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं. मुलीच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्यानंतर एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये ती मुलगी बॉयफ्रेंडसोबत लग्न करताना दिसतेय. तिने म्हटलय माझं किडनॅप झालेलं नाही, मी माझ्या मर्जीने लग्न केलं.

मुलगी म्हणाली, कुटुंबीय माझ्या मर्जीविरोधात दुसरीकडे लग्न लावून देत होते. त्यांनी माझ्यासाठी जो मुलगा निवडलेला, तो मला पसंत नव्हता. माझं माझ्या प्रियकरावर प्रेम होतं. म्हणून मी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं. मुलीने वडिलांचे आरोप खोटे ठरवले. युवकाने मुलीला किडनॅप केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला होता. व्हिडिओच्या माध्यमातून मुलीने पोलिसांची मदत मागितली आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

माझ्यावर कोणाचा दबाव नव्हता

व्हायरल व्हिडिओत मुलगा मुलीच्या डोक्यात सिंदूर भरताना दिसतो. सिंदूर लावत असताना आसपास कोणी दिसत नाही. मुलगा मुलीच्या डोक्यात सिंदूर भरत असताना दुसरा कोणीतरी तिथे व्हिडिओ बनवत होता. व्हिडिओमध्ये लग्न केल्यानंतर मुलगी समोर येऊन बोलली. मी माझ्या मर्जीने कोर्टात लग्न केलं. माझ्यावर कोणाचा दबाव नव्हता.

म्हणून मी हे पाऊल उचललं

युवतीने व्हिडिओमध्ये सांगितलं, माझं अपहरण झालेलं नाही. मी माझ्या मर्जीने घर सोडून आलीय. माझे कुटुंबीय माझ्या मर्जीविरोधात दुसरीकडे माझं लग्न ठरवत होते. म्हणून मी हे पाऊल उचललं. माझं किडनॅपिंग झालेलं नाही.

पोलीस प्रशासनाची मदत मागितली

युवतीने पोलीस प्रशासनाकडे मदत मागितली आहे. माझ वय पूर्ण आहे. मी माझ्या मर्जीने लग्न केलय. माझ्या नवऱ्यावर आणि कुटुंबावर जी केस केलीय, ती योग्य नाही. माझे कुटुंबीय मला जीवे मारण्याची धमकी देतायत असही तिने म्हटलं. जिथे दिसशील तिथे संपवू असं ते म्हणतायत. मला माझ्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाची मदत हवी आहे असं मुलीने म्हटलय.