डर्टी स्टोरी… मुलगा नपुंसक निघताच सासरा सुनेला म्हणाला, तू माझ्याशी…

बिजनौरमधील एका महिलेने सासरा आणि पतीसह सात जणांवर गंभीर आरोप केले आहेत. सासरा हुंड्यासाठी छळ करत असून खासगी क्षणांचे व्हिडिओ बनवत असल्याचा तिचा दावा आहे. पती नपुंसक व मानसिक रुग्ण असून उपचाराऐवजी सासरा संबंधांसाठी दबाव टाकत होता. विरोध केल्यावर पती-सासऱ्याने मारहाण केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे.

डर्टी स्टोरी... मुलगा नपुंसक निघताच सासरा सुनेला म्हणाला, तू माझ्याशी...
bride
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2026 | 3:31 PM

उत्तर प्रदेशातील बिजनौरमधील एका महिलेने तिच्या सासऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. हुंड्यापासून ते खासगी क्षणांचे व्हिडीओ बनवल्याचा आरोप या महिलेने सासऱ्यावर केला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचा नवरा नपुंसक आणि मानसिक रुग्ण आहे. नवऱ्यावर उपचार करायचं सोडून सासऱ्याने माझ्यावर संबंध बनवण्यासाठी दबाव टाकला. जेव्हा मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली तेव्हा नवरा आणि सासऱ्याने मला जबर मारहाण केली. या महिलेने सासरा आणि नवऱ्यासह सात जणांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

बिजनौरच्या हिमपुरदीपा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या एका गावातील हे प्रकरण आहे. नगीना पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात राहणाऱ्या तरुणीचं येथील एका तरुणासोबत लग्न झालं होतं. या तरुणीच्या मते, तिच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी सुमारे 25 लाख रुपये खर्च केले होते. नव्या घरात आपली पोरगी सुखात राहिल. तिला काही त्रास होणार नाही, असं तिच्या कुटुंबीयांना वाटत होतं. पण लग्नाच्या काही काळानंतर तिच्या सासरी वादाला सुरुवात झाली.

Loading...

कुटुंब सासऱ्यावर अवलंबून

सासरच्या मंडळीकडून पाच लाख रुपये आणि एका कारची मागणी होऊ लागली. तिने ही मागणी पूर्ण न केल्याने तिला माराहण करण्यात येत होती. महिलेच्या मते, तिचा नवरा काहीच काम करत नाही. तर सासरा नोकरी करतो. घर खर्चासाठी संपूर्ण कुटुंब सासऱ्यावर अवलंबून आहे. या महिलेने तक्रारीत अनेक गंभीर गोष्टी सांगितल्या आहेत. माझा नवरा नपुंसक आहे. तो मानसिक रुग्ण आहे. अशा परिस्थितीत नवऱ्यावर उपचार करायचं सोडून सासऱ्याने त्यांच्याशी संबंध बनवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला, असा आरोप या महिलेने केला आहे.

घरातून हाकलले

जेव्हा मी माझ्या नवऱ्याला ही गोष्ट सांगितली. तर त्याने माझी साथ देण्याऐवजी मलाच मारहाण करायला सुरुवात केली. सासरी मला होणारा त्रास समजून घेण्याऐवजी माझा छळ करण्यात येऊ लागला, असं या महिलेने म्हटलं आहे. हुंड्यासाठी माझा नवरा, सासू, सासरा, चुलत सासरा, मामे सासरा, दीर आणि नणंद मला मारहाण करत होते. मला घरातूनही हाकलून देण्यात आलं होतं, असा आरोप या महिलेने केला आहे.

या सर्व त्रासानंतरही ती 5 ऑक्टोबर रोजी परत सासरी आली. पण तिथे आल्यावर परत तिला मारहाण करण्यात आली. तिचा छळ करण्यात आला. मी 15 ऑक्टोबर रोजी कपडे बदल होते. तेव्हा माझा व्हिडीओ बनवला गेला. चुकीचं काम करावं म्हणून सासरचे लोक मला त्रास देत होते, असा आरोप या महिलेने केला आहे.

पोलीस काय म्हणाले?

दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यावर हिमपूरदीपा पोलीस ठाण्याचे एसएचओ रवि करण सिंह यांन मीडियाशी संवाद साधला. आम्हाला महिलेची तक्रार मिळाल्यानंतर आम्ही त्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. महिलेचा सासरा फरार आहे. त्याला अटक करण्यासाठी आमच्या टीम काम करत आहेत, असं रवि करण सिंह म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us