Ganesh Naik Bail : अटकेची टांगती तलवार हटली! गणेश नाईकांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा, जामीन मंजूर

| Updated on: Jun 17, 2022 | 2:41 PM

गणेश नाईकांचा अटकपूर्व जामीन अखेर मंजूर

Ganesh Naik Bail : अटकेची टांगती तलवार हटली! गणेश नाईकांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा, जामीन मंजूर
गणेश नाईक आणि त्यांच्यावर आरोप करणारी पीडित महिला
Image Credit source: TV9
Follow us on

नवी मुंबई : भाजप आमदार गणेश नाईकांना (Ganesh Naik Latest News) मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court) अखेर जामीन मंजूर केला आहे. गणेश नाईकांवर खरंतर अटकेची टांगती तलवार होतीत. कारण ठाणे सत्र न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यानंतर गणेश नाईक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर त्यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिलाय. त्यांचा अटकपूर्ण जामीन मंजूर (Bail acc) करण्यात आलाय. त्यामुळे नॉट रिचेबल असलेले गणेश नाईक आता अखेर समोर येण्याची शक्यता आहे. एका महिलेनं गणेश नाईक यांच्यावर सनसनाटी आरोप केले होते. या आरोपांवरुन गणेश नाईकांवर नवी मुंबईतल्या दोन पोलीस स्थानकांत गुन्हा नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी सुरुवातील ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्ण जामीन गणेश नाईक यांच्याकडून करण्यात आलेला होता. हा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर गणेश नाईक यांनी हायकोर्टात धाव घेतलेली. अखेर हायकोर्टानं गणेश नाईक यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

गणेश नाईक आता समोर येणार?

दरम्यान, आता अटकपूर्व जामीन मंजूर आल्यानंतर गणेश नाईक समोर येण्याची शक्यता आहे. गणेश नाईक समोर येऊन आपल्यावर करण्यात आलेल्या सनसनाटी आरोपांबाबत नेमकं आता काय स्पष्टीकरण देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. ठाणे सत्र न्यायालयानं गणेश नाईकांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर गणेश नाईक हे नॉट रिचेबल होते. आता ते समोर येतात का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

काय आहेत आरोप?

भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या दीपा चव्हाण यांनी आपल्या जीविताला धोका असल्याचं म्हटलं होतं. नाईक यांना जामीन मिळाल्यास माझं अपहरण होऊ शकतं तसेच माझ्याकडून जबरदस्तीने काही लिहून घेतलं जाऊ शकतं, असाही आरोप पीडित महिलेनं केला होता. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये गेली 27 वर्ष एका महिलेसोबत राहत तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि तिला धमकावल्याचा आरोप गणेश नाईक यांच्यावर करण्यात आलाय. नवी मुंबईतल्या दोन वेगवेगल्या पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

दिवसभरातला दुसरा दिलासा

एकीकडे नवनीत राणा आणि रवी राणा यांचा जामीन अर्जही कोर्टानं मंजूर केला होता. अटी शर्थींसह हा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. त्यानंतर काही मिनिटांच्या अंतरानं मंबई हायकोर्टाने गणेश नाईकांना दिलासा दिल्याचं वृत्त हाती आलंय. गणेश नाईकांचा जामीन मंजूर करण्यात आल्यानं आता याप्रकरणातील घडामोडींनाही वेग येण्याची शक्यता आहे.

नवनीत राणा यांना जामीन मिळाल्यानंतर काय म्हणाले वकील? : पाहा व्हिडीओ