Koffee with Karan: ‘कॉफी विथ करण’बद्दल करण जोहरची महत्त्वपूर्ण घोषणा

या शोमध्ये करण आणि सेलिब्रिटींमध्ये रंगलेल्या गप्पा पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे. पडद्यावरील आणि पडद्यामागील बऱ्याच गोष्टींचा उलगडा हे सेलिब्रिटी या शोमध्ये करायचे. याच शोमध्ये करणचा कंगना रनौतशी (Kangana Ranaut) वाद झाला होता.

Koffee with Karan: 'कॉफी विथ करण'बद्दल करण जोहरची महत्त्वपूर्ण घोषणा
Koffee with Karan
Image Credit source: Hotstar
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 04, 2022 | 11:43 AM

निर्माता- दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) हा चॅट शो चांगलाच लोकप्रिय आहे. या शोचे आतापर्यंत सहा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. करणने याआधीच्या सिझनमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना या शोमध्ये आमंत्रित केलं होतं. या शोमध्ये करण आणि सेलिब्रिटींमध्ये रंगलेल्या गप्पा पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे. पडद्यावरील आणि पडद्यामागील बऱ्याच गोष्टींचा उलगडा हे सेलिब्रिटी या शोमध्ये करायचे. याच शोमध्ये करणचा कंगना रनौतशी (Kangana Ranaut) वाद झाला होता. ज्यानंतर तिने करणवर घराणेशाहीचा आरोप केला होता. आता या चॅट शोबाबत (Chat Show) करणने महत्त्वूपर्ण घोषणा केली आहे. या लोकप्रिय शोचा सातवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. इतकंच नव्हे तर या सिझनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी येतील, याचासुद्धा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आता कॉफी विथ करण हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार नसल्याचं करणने स्पष्ट केलं.

करण जोहरची पोस्ट-

‘हॅलो, गेल्या सहा सिझन्सपासून कॉफी विथ करण हा शो माझ्या आणि तुमच्या आयुष्याचा भाग होता. या शोद्वारे मी लोकांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी ठरलो आणि पॉप कल्चरच्या इतिहासातही आम्हाला आमची जागा मिळाली. तरीही अत्यंत जड अंत:करणाने मी हे सांगू इच्छितो की कॉफी विथ करण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही’, अशी पोस्ट त्याने लिहिली.

19 नोव्हेंबर 2004 रोजी या शोचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या खासगी आयुष्यातील महत्त्वाचे खुलासे केले होते. सध्या करण जोहर त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटातील महत्त्वाचा भाग मे महिन्यात शूट होणार आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें