AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhiwandi Fire | भिवंडीतील निलेश डाईंग इमारतीला भीषण आग, मोठ्या प्रमाणावर नुकसान

Bhiwandi Fire | भिवंडीतील निलेश डाईंग इमारतीला भीषण आग, मोठ्या प्रमाणावर नुकसान

| Updated on: Feb 28, 2026 | 12:22 PM
Share

भिवंडी शहरातील खोका कंपाउंड परिसरात असलेल्या ‘निलेश डाईंग’ या धाग्यावर रंगप्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत तीन मजली इमारत पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

भिवंडी शहरातील खोका कंपाउंड परिसरात असलेल्या ‘निलेश डाईंग’ या धाग्यावर रंगप्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत तीन मजली इमारत पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच भिवंडी आणि कल्याण महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू असून आगीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात येत आहे.

Published on: Feb 28, 2026 12:22 PM
Follow Us