AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss Marathi : घटस्फोटित हिरोचं अभिनेत्रीला Kiss, संतापलेल्या राखी सावंतने केसच कापले

तन्वी कोलते आणि राकेश बापट यांच्या रोमँटिक डान्स आणि किसने बिग बॉसच्या घरात खळबळ उडाली. मात्र हे पाहून राखी सावंतला अश्रू अनावर झाले, ती संतापली. आणि त्याच रागाच्या भरात तिने..

Bigg Boss Marathi : घटस्फोटित हिरोचं अभिनेत्रीला Kiss, संतापलेल्या राखी सावंतने केसच कापले
बिग बॉस मराठी मध्ये राखी सावंत भडकली
| Updated on: Feb 28, 2026 | 1:30 PM
Share

‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi) सध्या 6 वा सीझन सुरू असून हा शो चांगलाच चर्चेत आहे. गेम जसजसा पुढे जात आहे, तसतशी नाती वेगाने बदलताना दिसत आहे. जे जुने शत्रु होते, ते आता मित्र बनताना दिसत असून इमोनशन टेन्शनही खूप वाढल्याचं दिसतंय. सध्या या शोच्या लेटेस्ट प्रोमोने तर एकदम खळबळच उडवली आहे. त्यात एका टास्कमध्ये (Rakesh Bapat) आणि तन्वी कोलते (Tanvi Kolte) यांचा रोमँटिक क्षण दाखवण्यात आला. काँटा गँगमध्ये असलेल्या राकेश आणि तन्वीची मैत्री चांगलीच वाढली असून त्याचंच प्रतिबिंब टास्कमध्येही दिसलं. मात्र यामुळे घरात वाईल्ड कार्ड म्हणून आलेली राखी सावंत काही फारशी खुश नसून, तिच्या हंगाम्यामुळे सगळेच हैराण झाले.

तन्वी-राकेशचा डान्स

घरात नुकताच एक टास्क झाला. आणि त्याच टास्कमध्ये तन्वी कोलते आणि राकेश बापट यांनी रोमँटिक डान्स केला. नव्या प्रोमोमध्ये ते अगदी स्पष्ट दिसलं. त्यांच्या केमिस्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या, पण त्याच टास्कमध्ये राकेशच्या एका कृतीमुळे तर सगळेच हैराण झाले. परफॉर्मन्सदरम्यान राकेश जे वागला ते पाहून राखी सावंत चांगलीच भडकली. आणि ते पाहून राकेशने तिला डिवचण्यासाठी असं काही केलं, ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला.

डान्स करतानाच राकेशने तन्वीच्या गालावर चक्क किस केलं, त्यामुळे घरातले सगळे सदस्य चक्रावलेच. राखीही ते दृश्य पाहून भडकली, अख्ख्या एपिसोडचा हा टर्निंग पॉईंट होता. राकेश तन्वीची केमिस्ट्री पाहून सदस्य हैराण झाले, पण काही जण शांत राहिले. मात्र हे पाहून शांत बसेल ती राखी सावंत कसली, तिने थेट गोंधळ माजवयला सुरूवात केली.

या शोमध्ये राखी ही राकेशशी इमोशनली अटॅच झालेली दिसली. पण टास्कदरम्यान राकेश-तन्वीची जवळीक ती सहन करू शकली नाही. तिने घरात हैदोस घातला एवढंच नव्हे तर रागाच्या भरात तिने स्वत:च्याच केसांवर कात्री चालवली, राखीने तिचेच केस कापले. ते पाहून राकेश, तन्वीने तिला रोखण्यासाठी धाव घेतली, पण राखी कोणाचंच ऐकत नव्हती. संतापाने थरथरत होती, रडतही होती.

प्रेक्षकांनी घेतली शाळा

मात्र राकेशचं कृत्य पाहून घरातले सदस्य आणि शोचे चाहते, प्रेक्षक सगळेच चक्रावले. राकेशनं तन्वीला किस केल्यानंतर नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे. हा फक्त ड्रामा असल्याचं अनेकांनी म्हटलं. बहीण भाऊ म्हणत म्हणत 😂😂 असे वागतात big boss साठी काय काय करतील,अशी कमेंट करत एकाने यावर तोंडसुख घेतलं. बहीण भाऊ बोलत ही काटा गँग जाम चालू काम करत असतात अशी कमेंटही आणखी एका युजरने केली आहे. राकेश हा बिग बॉस हाऊस चा इम्रान हाश्मी आहे, अशा शब्दांत आणखी एक युजरने त्याला खडेबोल सुनावले आहेत. पण एका प्रेक्षकाने राखीलाच सुनावलंय. राखीने हेअरकट केला असता, तर खूप छान झाले असते, खोटे केस कापून काही उपयोग नाही.

Follow Us
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान
विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान.
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार
आयटी कंपनीतील धर्मांतराचा उद्रेक... सकल हिंदू समाजाचा महाएल्गार.
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नारी शक्ती की भाजपा शक्ती?; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं
काहीच आठवेना... माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती चिं.
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान
महापालिकेत आत्म्यांचा वावर?, मंत्र्यांचं धक्कादायक विधान.
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत
भोंदू खरात प्रकरणी पडद्यामागे मोठ्या हालचाली, पोलिसांकडून... बड्या नेत.
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,
नाशिकच्या IT कंपनीतील महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे मलेशिया कनेक्शन,.
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो
अमरावती अत्याचार प्रकरणात पोलीस अलर्ट मोडवर, आयाज अहमदच्या घरावर बुलडो.
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय
कैसा हराया... म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकं काय.
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक....
परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत 180 हून अधिक.....