AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अटल सेतूवर धावत्या कारने घेतला पेट!

अटल सेतूवर धावत्या कारने घेतला पेट!

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Feb 28, 2026 | 12:14 PM
Share

रात्री मुंबईच्या अटल सेतूवर नवी मुंबईहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर एका धावत्या कारने अचानक पेट घेतला. तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कारमधील दोन प्रवासी सुखरूप बाहेर पडले. घटनेनंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र आता वाहतूक सुरळीत झाली असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रात्री मुंबईच्या अटल सेतूवर नवी मुंबईकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर एका कारने अचानक पेट घेतला. रात्री सव्वानऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने ही आग लागली.

कारमध्ये असलेले दोन प्रवासी चालकाच्या सतर्कतेमुळे वेळीच बाहेर पडले. चालकाने तातडीने गाडी बाजूला घेतल्याने मोठी दुर्घटना टळली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे अटल सेतूवर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

सध्या अग्निशमन दल आणि वाहतूक पोलीस आगीच्या कारणांची सखोल चौकशी करत आहेत. मात्र, आता अटल सेतूवरील दोन्ही मार्गांवर, म्हणजेच नवी मुंबई ते मुंबई आणि वडाळा ते नवी मुंबई, वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

Published on: Feb 28, 2026 12:14 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या