AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-Israel War : युद्ध सुरु, इस्रायल भारताला जे घातक अस्त्र देणार अशी चर्चा, त्या आर्यन बीमची आता खरी परीक्षा

Iran-Israel War : इस्रायलने शनिवारी सकाळी हा हल्ला केलाय. इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर इस्रायलने हल्ला चढवला. इराणमध्ये अनेक ठिकाणी धुरांचे लोळ हवेत उठताना दिसतायत.

Iran-Israel War : युद्ध सुरु, इस्रायल भारताला जे घातक अस्त्र देणार अशी चर्चा, त्या आर्यन बीमची आता खरी परीक्षा
Israel Attack Iran
| Updated on: Feb 28, 2026 | 1:30 PM
Share

इराण आणि इस्रायलमध्ये घनघोर युद्धाला सुरुवात झाली आहे. सात ते आठ महिन्याच्या आत हे दोन्ही देशांमध्ये दुसरं युद्ध आहे. अमेरिका इराणवर हल्ला करणार अशी दाट शक्यता वाटत होती. पण त्याआधी अचानक इस्रायलनेच हल्ला केला. युद्ध नितीमध्ये दिशाभूल एक तंत्र असतं. अमेरिका-इस्रायलने त्याचाच वापर केला. अमेरिका हल्ला करणार अशी हवा तयार केली. पण प्रत्यक्षात पहिला हल्ला इस्रायलयने केला. बहुतांशवेळा अनेक लढाया, युद्ध ही रात्रीच्यावेळी लढली जातात. ज्यावेळी शत्रू जास्त सतर्क असतो. पण इस्रायलने शनिवारी सकाळी हा हल्ला केलाय. इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर इस्रायलने हल्ला चढवला. इराणमध्ये अनेक ठिकाणी धुरांचे लोळ हवेत उठताना दिसतायत.

इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचे सुप्रीम लीडर खामेनेई यांना सुरक्षित ठिकाणी शिफ्ट केलय. इराणमधील सर्व उड्डाणं थांबवण्यात आली आहेत. इराणचा एअरस्पेस पू्र्णपणे रिकामी करण्यात आलाय. इराण आणि इस्रायल दोन्ही ठिकाणी हवाई हल्ल्याची माहिती देणारे सायरन वाजत आहेत. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावर होते. 25 आणि 26 फेब्रुवारी असा दोन दिवसीय मोदींनी इस्रायल दौरा केला. मोदी भारतात परतताच दोन दिवसात इस्त्रायलने इराण विरोधात एवढी मोठी कारवाई केली आहे.

आर्यन बीम लेझन गाईडेड एनर्जी वेपन

पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलमध्ये असताना दोन्ही देशांमध्ये अनेक करार झाले. शेती, तंत्रज्ञान, संरक्षण क्षेत्राशी संबंधित हे करार होते. यात आर्यन डोम आणि आर्यन बीम या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. आर्यन डोम आणि आर्यन बीम ही एअर डिफेन्स सिस्टिम आहे. पंतप्रधान मोदींनी भारताच्या हवाई हल्ल्यापासून सुरक्षिततेसाठी मिशन सुदर्शन चक्रची घोषणा केलीय. इस्रायल आर्यन डोम आणि आर्यन बीमचं तंत्रज्ञान आपल्याला देणार अशी चर्चा आहे. आर्यन डोम पेक्षा आर्यन बीम जास्त महत्वाचं आहे. कारण आर्यन बीम लेझन गाईडेड एनर्जी वेपन आहे. शत्रुची मिसाईल्स, फायटर जेट्स, ड्रोन्सना हवेतच नष्ट करण्यासाठी आर्यन डोम आणि आर्यन बीमचा वापर होतो.

… तर त्याची उपयुक्तता लक्षात येईल

यात आर्यन डोमने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. पण एकाचवेळी बरीच मिसाइल, ड्रोन्स डागल्यानंतर काही वेळा आर्यन डोम ते रोखण्यात कमी पडतं. हे जून महिन्यात झालेल्या युद्धावेळी दिसून आलं. आता आर्यन बीम हे इस्रालयच नवीन, अत्याधुनिक अस्त्र आहे. इराणने मिसाईल हल्ला केल्यानंतर आर्यन बीमचा वापर होऊ शकतो. त्यामुळे आर्यन बीम किती प्रभावी आहे ते या युद्धात समजेल. आर्यन डोम महागडं शस्त्र आहे तेच आर्यन बीम स्वस्त पडतं. त्यामुळे इस्रायलने आर्यन बीमचा वापर केला तर त्याची उपयुक्तता लक्षात येईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...