AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Iran Conflict : अख्खं जगच हादरलं… इराणवर महाभयंकर मिसाईल हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये आणीबाणी घोषित; सायरनच्या आवाजाने…

इराणच्या राजधानी तेहरानवर इस्रायलने महाभयंकर मिसाईल हल्ला केल्यानंतर जगाला हादरा बसला आहे. या हल्ल्यामुळे इस्रायलने आपल्या देशात तातडीने आणीबाणी घोषित केली असून, सर्वत्र सायरन वाजवले जात आहेत. इराणकडून प्रत्युत्तराची भीती असल्याने इस्रायलने हवाई क्षेत्र बंद करून, शाळांना सुट्टी दिली आहे. या वाढत्या तणावाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं असून, इराणच्या पुढील भूमिकेची प्रतीक्षा आहे.

Israel-Iran Conflict : अख्खं जगच हादरलं... इराणवर महाभयंकर मिसाईल हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये आणीबाणी घोषित; सायरनच्या आवाजाने...
| Updated on: Feb 28, 2026 | 2:06 PM
Share

जगाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. इस्रायल आणि इराणमधील विस्तवाची पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. इस्रायलने आज इराणच्या राजधानीवर महाभयंकर हल्ला केला आहे. इस्रायलने मिसाईल अटॅक करून इराणच्या राजधानीत एकच खळबळ उडवून दिली आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलने आपल्याच देशात आणीबाणी घोषित केली आहे. इतकेच नाही तर इस्रायलच्या प्रत्येक गल्लीत आणि रस्त्यावर सायरन वाजवला जात आहे. यावरून इस्रायल आता युद्धाच्या मूडमध्येच असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर इराण आता त्यावर कशी प्रतिक्रिया देतो याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

इराणच्या विरोधात प्रीएम्पिटिव्ह स्ट्राईक करण्यात आल्यानंतर इस्रायलमधील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. इराणकडूनही जशास तसे उत्तर मिळण्याची शक्यता असल्याने इस्रायलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. इस्रायलमध्ये तातडीने आणीबाणी लागू करण्यात आली आहे. तसेच देशभरात सायरन वाजवले जात आहेत. त्याशिवाय मोबाईलवर नागरिकांना मेसेज पाठवून सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचे संदेश धडाधड पाठवले जात आहेत. तसेच इस्रायलने त्यांचे हवाई क्षेत्रही बंद केले आहे. त्यामुळे इस्रायलमधून एकाही विमानाचं उड्डाण होणार नसून इस्रायलमध्ये कोणतंही विमान येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने याबाबतची माहिती दिली आहे.

अलर्ट राहा… नागरिकांना मेसेज

हा एक प्रोएक्टिव्ह अलर्ट आहे. कोणत्याही शक्यतेला किंवा संकटाला सामोरे जाण्याची नागरिकांची तयारी झाली पाहिजे म्हणून त्यांना अलर्ट पाठवला आहे. इस्रायलवर मिसाईलचा अटॅक होऊ शकतो. त्यामुळे आम्ही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जायला सांगितलं आहे, असं आयडीएफने म्हटलं आहे. तसेच आम्ही देशात आणीबाणी घोषित केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्ज यांनी राष्ट्रीय स्तरावर आणीबाणी घोषित केली आहे. तसेच त्यांनी इस्रायलमध्ये मिसाईल आणि ड्रोन अटॅक होण्याची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच इस्रायलने आपले एअरस्पेस पूर्णपणे बंद केले आहेत. तसेच इस्रायलच्या सीमाभागात प्रवेश करू नका, असं आवाहनच इस्रायलने जगातील सर्व एअरलाइन्सला केलं आहे.

वर्क फ्रॉम होम, शाळांना सुट्टी

दरम्यान, देशभरातील शाळा कॉलेजही बंद करण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आलं आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

दुसरीकडे, इराणची राजधानी तेहरानमध्ये मिसाईलचा हल्ला करण्यात आला आहे. वृतसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, यूनिव्हर्सिटी स्ट्रीट आणि जोमहुरी परिसरात मिसाईलचा मारा करण्यात आला आहे. इराणच्या सरकारी मीडियानेही तेहरानमध्ये कमीत कमी तीन स्फोटांचे आवाज ऐकायला आल्याचं स्पष्ट केलंय. मात्र, या हल्ल्यात किती नुकसान झालंय याची माहिती देण्यात आलेली नाहीये.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...