AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana Bail : नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मंजूर! 3 अटी मानल्या नाहीत तर पुन्हा जेलवारी अटळ, कोणत्या आहेत त्या 3 अटी?

मुंबई सत्र न्यायालयानं अखेर राणा दाम्पत्याचा जामीन मंजूर केला आहे.

Navneet Rana Bail : नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मंजूर! 3 अटी मानल्या नाहीत तर पुन्हा जेलवारी अटळ, कोणत्या आहेत त्या 3 अटी?
नवनीत राणा, रवी राणाImage Credit source: TV9
| Updated on: May 04, 2022 | 11:56 AM
Share

मुंबई : नवनीत राणा आणि रवी राणा (Navneet Rana Ravi Rana Bail) यांना अखेर मुंबईच्या सत्र न्यायालयानं (Mumbai Session Court) दिलासा दिलाय. नवनीत राणा आणि रवी राणा यांचा जामीन अखेर मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या या जामीनामुळे (Bail to Navneet Rana) आता नवनीत राणा आणि रवी राणा यांचा कोठडीतून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, जामीन जरी मंजूर झालेला असला, तरी आता नवनीत राणा आणि रवी राणा यांना माध्यमांशी बोलण्यात मज्जाव करण्यात आलाय. त्याचप्रमाणेत 50 हजार रुपयांच्या जातमुचल्यावर हा जामीन मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केलाय. हा जामीन मंजूर करताना कोर्टाननं राणा दाम्पत्याला काही अटीदेखील खातलेल्या आहेत. पुराव्यांत छेडछाड न करण्याचीही हमी त्यांच्याकडून घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तपास प्रभावित होईल, अशी कोणतीही कृती त्यांच्याकडून केली जाणार नाही, अशीही अट कोर्टानं त्यांना घातली आहे. विशेष म्हणजे राणा दाम्पत्याला कोणत्याही माध्यमांशी बोलण्यात सक्त मनाई कोर्टानं केली आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा तुरुंगातील मुक्काम सातत्यानं वाढला होता. त्यामुळे त्यांना जामीन मिळतो की नाही, याकडे सगळ्यांची नजर लागली होती सोमवारी या जामीनावर युक्तिवाद झाला होता. त्यानंतर कोर्टानं बुधवारी म्हणजे आज प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. अखेर राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील निर्णय आज सुनाण्यात आला. राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्ट दुसऱ्या प्रकरणांमध्ये व्यस्त होती. तरीही थोडा फार वेळ देत कोर्टानं निकाल वाचनास बुधवारची वेळ दिली होती. आज या निकालाचं वाचन करण्यात आलं. त्यात राणा दाम्पत्याला जामीन देण्याचा निर्णय घेत असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं. मात्र त्यासोबत कोर्टानं तीन महत्त्वाच्या अटी राणा दाम्पत्याला जामीन देताना घातल्या आहेत.

कोणत्या आहेत अटी?

  1. राणा दाम्पत्य जामीनावर असताना त्यांना माध्यमांशी बोलण्यास मज्जाव असेल. माध्यमांशी बोलल्यास जामीनअर्ज रद्द होणार
  2. 50 हजार रुपयांच्या जातमुचल्याकवर त्यांना जामीन देण्यात आला आहे, याची हमी देताना फसवणूक झाल्यासही जामीन अर्ज रद्द होऊ शकतो
  3. शिवाय तपासादरम्यान, पुराव्यांशी छेडछाड केली किंवा तपास प्रभावित होईल, असं कृत्य केलं, तरिदेखील पुन्हा एकदा राणा दाम्पत्याला जेलची हवा खावी लागू शकते.

..तर जामीन रद्द होणार!

वर नमूद केलेल्या अटींची अंमलबजावणी काटेकोरणपणे आता नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्याला करावी लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यातील एक जरी अट पाळली गेली नाही, तर या देण्यात आलेला जामीनअर्ज रद्द करण्यात येईल, असा इशाराही कोर्टाकडून देण्यात आला आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर राजद्रोहाची कलमं लावण्यात आली होती. त्याचप्रमाणे हनुमान चालिसा वाचवण्यासाठी 149ची नोटीसही त्यांना देण्यात आलेली. जबरदस्तीनं कुणाच्या घरी जाऊन हनुमान चालिसा वाचण्याचा आग्रह चुकीचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता. 124 अ कलमही त्यांना लागू असल्याचा दावा सरकारी वकिलांनी युक्तिवादादरम्यान केला होता.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....