AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2026 Final : कॅप्टन स्मृतीची ऐतिहासिक कामगिरी, मोठा रेकॉर्ड ब्रेक, हरमनप्रीत कौरला दुहेरी झटका

Smriti Mandhana Ornage Cap wpl 2026 : स्मृती मंधाना हीने आरसीबीला दुसऱ्यांदा चॅम्पियन करण्यात प्रमुख योगदान दिलं. तसेच स्मृतीने यासह 2 मोठे विक्रम केले. स्मृतीने मुंबईची कॅप्टन हरमनप्रीत कौर हीचा रेकॉर्ड ब्रेक केला.

WPL 2026 Final : कॅप्टन स्मृतीची ऐतिहासिक कामगिरी, मोठा रेकॉर्ड ब्रेक, हरमनप्रीत कौरला दुहेरी झटका
Smiriti Mandhana WPL 2026 Winner Captain RcbImage Credit source: WPL X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 06, 2026 | 3:29 AM
Share

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सला पराभूत केलं. आरसीबी यासह चॅम्पियन्स ठरली. आरसीबीची ट्रॉफी जिंकण्याची ही या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी वेळ ठरली. आरसीबीने 204 धावांचं विजयी आव्हान हे 2 बॉलआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. आरसीबीच्या विजयात कॅप्टन स्मृती मंधाना हीने सर्वाधिक योगदान दिलं. स्मृतीने सर्वाधिक 87 धावा केल्या. स्मृतीने यासह खास कामगिरी केली. स्मृतीने मुंबई इंडियन्सची कॅप्टन हरमनप्रीत कौर हीचा 1 विक्रम मोडीत काढला. तसेच स्मृतीने हरमनप्रीतच्या एका विक्रमाची बरोबरी केली. स्मृती मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर हीला पछाडत चौथ्या मोसमात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. तसेच स्मृतीने हरमनप्रीतच्या कॅप्टन म्हणून 2 ट्रॉफी जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरीही केली.

स्मृतीने नक्की काय केलं?

स्मृतीने विजयी धावांचा पाठलाग करताना जॉर्जिया वॉल हीच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी 92 बॉलमध्ये 165 रन्सची पार्टनरशीप केली. तसेच स्मृतीने या महत्त्वाच्या सामन्यात 41 बॉलमध्ये 87 धावा केल्या. स्मृतीने या खेळीत 3 सिक्स आणि 12 चौकार लगावले. स्मृतीने या दरम्यान 53 वी धाव करताच इतिहास घडवला. स्मृती यासह हरमनप्रीत कौर हीला मागे टाकत चौथ्या मोसमात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. स्मृतीने यासह ऑरेंज कॅप पटकावली.

स्मृतीने 9 सामन्यांतील 9 डावांत 53.86 च्या सरासरीने आणि 153.25 च्या स्ट्राईक रेटने एकूण 377 धावा केल्या. स्मृतीने या दरम्यान एकूण 57 चौकार आणि 9 षटकार लगावले. तर हरमनप्रीतने 8 सामन्यांत 342 धावा केल्या.

हरमनप्रीतच्या विक्रमाची बरोबरी

तसेच आरसीबीने डब्ल्यूपीएल ट्रॉफी जिंकताच स्मृतीने हरमनप्रीत कौर हीच्या विक्रमाची बरोबरी केली. स्मृती मंधाना हीची कॅप्टन म्हणून आरसीबीला डब्ल्यूपीएल ट्रॉफी जिंकून देण्याची ही दुसरी वेळ ठरली. स्मृतीने यासह हरमनप्रीतची बरोबरी साधली. स्मृतीने आरसीबीला याआधी 2024 साली डब्ल्यूपीएल ट्रॉफी जिंकून दिली होती. तर हरमनप्रीतने मुंबईला 2023 आणि 2025 ला विजयी केलं होतं.

स्मृती ऑरेंज कप विजेती

आरसीबी फ्रँचायजीची तिसरी ट्रॉफी

दरम्यान आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रँचायजीची ही एकूण तिसरी ट्रॉफी ठरली. याआधी रजत पाटीदार याने आरसीबीला आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) त्याच्या नेतृत्वात पहिल्यांदा चॅम्पियन केलं होतं. आरसीबीने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वातील पंजाब किंग्सला पराभूत करत ही कामगिरी केली होती.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...