AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: दम्याच्या त्रासाला कंटाळून चांदी व्यापाऱ्याची आत्महत्या

काही दिवसांपूर्वीच अमोल बजरंग माळी यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरु होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. | Businessman Suicide in ichalkaranji Maharashtra

मोठी बातमी: दम्याच्या त्रासाला कंटाळून चांदी व्यापाऱ्याची आत्महत्या
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Jun 08, 2021 | 11:41 AM
Share

इचलकरंजी: हुपरी येथील प्रसिद्ध चांदीचे व्यापारी अमोल बजरंग माळी (वय 55) मंगळवारी पहाटे डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. दम्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. (Businessman in ichalkaranji suicide by firing bullet in head)

प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच अमोल बजरंग माळी यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरु होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. मात्र, त्यांना आधीपासून असणारी दम्याची व्याधी बळावल्याने अमोल माळी आयुष्याला कंटाळाले होते. याच नैराश्यातून त्यांनी आज पहाटे आपल्या निवासस्थानी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली.

अमोल माळी हे इचलकरंजीमधील प्रसिद्ध चांदी उद्योजक होते. या परिसरात त्यांच्या व्यवसायाचा मोठा पसारा होता. अमोल माळी यांच्या बेडरुममधून गोळी झाडल्याचा आवाज येताच कुटुंबीयांनी त्याठिकाणी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत अमोल माळी यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तर शहरातील व्यापाऱ्यांनी अमोल माळी यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली आहे.

संबंधित बातम्या:

फेसबुकवर चाईल्ड पोर्नोग्राफीचा व्हीडिओ टाकणाऱ्या इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक

धक्कादायक! सावत्र आईकडून मूकबधीर मुलाचा छळ; रागाच्या भरात गुप्तांगावर चटके

Video: पोटात घुसलेला चाकू घेऊन तरुण पोलीस ठाण्यात, नागपूरच्या व्हिडीओनं महाराष्ट्र हादरला

(Businessman in ichalkaranji suicide by firing bullet in head)

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ