AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलच्या खोलीत घुसून तरुणीची हत्या, चार वर्षांपासून रुम बुक करणारा मित्र संशयाच्या भोवऱ्यात

दिल्लीतील दक्षिण पश्चिम भागात महिपालपूर परिसरातील लक रेसिडेन्सी हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हॉटेलच्या खोलीत घुसून सोनियाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

हॉटेलच्या खोलीत घुसून तरुणीची हत्या, चार वर्षांपासून रुम बुक करणारा मित्र संशयाच्या भोवऱ्यात
दिल्लीतील हॉटेलमध्ये तरुणीची हत्याImage Credit source: आज तक
| Updated on: Feb 28, 2022 | 6:44 AM
Share

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील दक्षिण पश्चिम भागात हत्येची (Delhi Crime) खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महिपालपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये (Hotel) तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. मयत तरुणीचे नाव सोनिया असल्याचे सांगण्यात येत आहे. हॉटेलच्या खोलीत घुसून सोनियाची हत्या (Murder) करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. शिवम नावाच्या तिच्या एका मित्रानेच ही हत्या केल्याचा संशय आहे. चार वर्षांपासून त्याने ही रुम बुक केल्याचं तपासात समोर आलं आहे. सोनियाची हत्या करुन शिवमने घटनास्थळावरुन पळ काढल्याचा आरोप आहे. 27 फेब्रुवारी रोजी व्हीके दक्षिण पोलिसांना महिपालपूर येथील लक रेसिडेन्सी हॉटेलमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली होती.

काय आहे प्रकरण?

दिल्लीतील दक्षिण पश्चिम भागात महिपालपूर परिसरातील लक रेसिडेन्सी हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हॉटेलच्या खोलीत घुसून सोनियाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

तरुणीच्या मित्रावरच संशय

हत्येची माहिती मिळताच डीसीपी (दक्षिण पश्चिम) घटनास्थळी पोहोचले. सोनिया असे मृत महिलेचे नाव आहे. गाझियाबादचा रहिवासी शिवम चौहान गेल्या 4 वर्षांपासून हॉटेलमध्ये रुम बुक करत आल्याचे तपासात समोर आले आहे. तो सोनियाचा मित्र होता.

खोलीच्या झडतीत दारुच्या बाटल्या सापडल्या

हॉटेलच्या खोलीमध्ये झडती घेत असताना पोलिसांना दारुच्या बाटल्याही सापडल्या आहेत. गुन्हे शाखेच्या तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मॉर्टमसाठी सफदरजंग रुग्णालयात पाठवला आहे.

या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु असून पथके तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल.

संबंधित बातम्या :

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

प्रेम विवाहानंतरही बायकोचं एक्स-बॉयफ्रेण्डशी लफडं सुरु, चिडलेल्या नवऱ्याकडून जन्माची अद्दल

नवी मुंबईतील लॉजवर प्रियकर-प्रेयसी भेटले, आधी जोरदार भांडणं, मग निर्घृण हत्याकांड

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.