AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : पोलीस कॉन्स्टेबल असल्याचा माज? तरुणाला मरेपर्यंत मारलं, नंतर फेकून दिलं, मारहाणीचा व्हिडीओ समोर

दिल्लीतील एका रस्त्यावर मध्यरात्री चार ते पाच जण मिळूण दोन जणांना बेदम मारहाण करतात. दरम्यान, एक तरुण पळून जाण्यात यशस्वी ठरतो.

VIDEO : पोलीस कॉन्स्टेबल असल्याचा माज? तरुणाला मरेपर्यंत मारलं, नंतर फेकून दिलं, मारहाणीचा व्हिडीओ समोर
पोलीस कॉन्स्टेबलने तरुणाला मरेपर्यंत मारलं
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jul 29, 2021 | 5:41 PM
Share

नवी दिल्ली : पोलीस आपलं संरक्षण करतात. ते दिवसरात्र आपली सुरक्षा करतात. मात्र, खाकी वर्दितही काही विकृत माणसं दडलेली असतात. या अशा विकृतांमुळे पोलीस खातं बदनाम होतं. अशीच काहिशी घटना नवी दिल्लीत समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कायद्याचं रक्षण करणारे पोलीसच अशाप्रकारे निघृण हत्या करत असतील तर सर्वसामान्यांनी नेमकं कुणाकडे जायचं? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

नेमकं काय घडलं?

दिल्लीतील एका रस्त्यावर मध्यरात्री चार ते पाच जण मिळूण दोन जणांना बेदम मारहाण करतात. दरम्यान, एक तरुण पळून जाण्यात यशस्वी ठरतो. पण दुसऱ्या तरुणाला चार-पाच जणांकडून प्रचंड मारहाण केली जाते. या तरुणाला चारही बाजूने काही तरुण घेरतात. तर एक जण त्याला प्रचंड मारहाण करतो. मारहाणीनंतर ते त्या तरुणाला गाडीत बसवतात आणि एका ठिकाणी फेकून देतात. या मारहाणीत ज्या तरुणाला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. विशेष म्हणजे तरुणाला मारहाण करातानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत.

तरुणाला मारहाण करणारा दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत

तरुणाला मारहाण करणारा नराधम हा दिल्ली पोलीस खात्यातील पोलीस कॉन्स्टेबल असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्याचं नाव मोनू सिरोही असं आहे. हा मोनू आधी दोन्ही तरुणांना मारहाण करतो. यादरम्यान एक तरुण पळून जाण्यात यशस्वी ठरल्यानंतर तो दुसऱ्या तरुणाला निघृणपणे मारहाण करतो. तो त्याला रस्त्यावर लोळवत मारहाण करतो. अखेर या मारहाणीत तरुणाचा मृत्यू होतो. त्यानंतर मोनू त्याला इतर चार साथीदारांच्या मदतीने गाडीत बसवतो आणि नंतर एका ठिकाणी त्याचा मृतदेह फेकून देतो.

‘इंडिया टुडे’ने या प्रकरणाशी संबंधित व्हिडीओ समोर आणला आहे. त्यावरुन ही घटना 13 जूनला घडल्याचा अंदाज आहे. या घटनेप्रकरणी मृतक तरुणाच्या कुटुंबियांनी अशोक नगर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी 24 तास उलटून गेल्यानंतरही गुन्हा दाखल केला नाही.

पोलीस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल

अखेर हे प्रकरणाची चर्चा होऊ लागल्यानंतर आता पोलिसांनी आरोपी पोलीस कॉन्स्टेबल मोनू सिरोही याला बेड्या ठोकल्या आहेत. मोनू याने तरुणाची हत्या का केली? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांचा याप्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे.

घटनेचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा : कुख्यात गुंडाचा जामीन अर्ज फेटाळला म्हणून न्यायाधीशाची हत्या? झारखंडचं संतापजनक प्रकरण, सीसीटीव्ही फुटेजमुळे कृत्य उघड

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...