AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंबिवलीत ‘बॅड टच’ करणारा अखेर गजाआड! चक्क 3200 बाईकचा तपास, नेमका ‘तो’ आरोपी कसा सापडला?

Dombiwali Police : विनयभंग करणाऱ्या या विकृत तरुणाने आणखीन किती मुलींसोबत असा प्रकार केला आहे, याचा तपास आत्ता पोलिस करीत आहेत. या आरोपीला शोधण्यासाठी तब्बल 3200 बाइकच्या तपास केलाय.

डोंबिवलीत 'बॅड टच' करणारा अखेर गजाआड! चक्क 3200 बाईकचा तपास, नेमका 'तो' आरोपी कसा सापडला?
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित आरोपी कैद
| Edited By: | Updated on: Feb 16, 2022 | 3:32 PM
Share

डोंबिवली : लहान मुलींवरही वाईट नजर ठेवलेल्या नराधमांची भीती कायम आहे. डोंबिवलीतून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग (minor girl molested) करण्यात आला. या मुलीनं घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितलं. घरातले पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यानंतर आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीची मदत घेतली. संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैदही झाला. पण यानंतर खरं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं होतं. पण आरोपीला शोधून काढण्यासाठी तब्बल 3200 बाईकचा तपास पोलिसांनी केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडलं देखील. पण त्याआधीची पोलिसांनी जी कसरत करावी लागली, ती फारच मोठी होती. दरम्यान, संशयित आरोपी हा प्रयागराज विद्यापीठाचा (Prayagraj University) विद्यार्थी असल्याची बाबही नंतर पोलिस तपासात समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

एका विकृत तरुणाला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अटक केली. या तरुणानंं एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. अमन यादव असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. तो प्रयागराग विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. दरम्यान, विनयभंग करणाऱ्या या विकृत तरुणाने आणखीन किती मुलींसोबत असा प्रकार केला आहे, याचा तपास आत्ता पोलिस करीत आहेत. या आरोपीला शोधण्यासाठी तब्बल 3200 बाइकच्या तपास केलाय.

कसा केली तपास?

डोंबिवलीच्या एका हाय प्रोफाईल परिसरात  एक लहान मुलगी आपल्या इमारतीच्या जिन्यातून खाली उतरत होती. तेव्हा तिला एका तरुणाने स्पर्श केला. मात्र या मुलीला लक्षात आला की, त्या व्यक्तीने मला ‘बॅड’ टच केलाय. मुलगी घाबरली. घरात गेली. मुलीने हा प्रकार तिच्या घरच्या मंडळींना सांगितला. घरातील लोक त्या तरुणाला पकडण्यासाठी घराबाहेर पडले. तोर्पयत तो पसार झाला होता.

सीसीटीव्हीची मदत

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. टोपी घातलेली असल्यानं आरोपी स्पष्ट दिसून येत नव्हता. हे प्रकरण मानपाडा पोलिस ठाण्यात पोहचले. एसीपी जे. डी. मोरे आणि सीनिअर पीआय शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी अविनाश वनवे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. परिसरातील सर्व सीसीटीव्ही पोलिसानी चेक केले. इतकेच नाही तर एके ठिकाणी तोच तरुण काही खेळणाऱ्या मुलांना लक्ष्य करण्यासाठी आला असता त्याची ब्लॅक कलरची युनीकॉन बाईक सीसीटीव्हीत कैद झाली.

3200 बाईकचा तपास!

अविनाश वनवे यांच्या पथकाने आधी ही माहिती काढली की, डोंबिवलीत किती जणांकडे युनीकॉन बाईक आहेत. आरटीओकडून सांगण्यात आले की, दहा हजार जणांकडे अशा प्रकारची बाईक असल्याची नोंद आहे. त्यामध्ये ब्लॅक कलरची बाईक 3200 आहेत. त्यापैकी सोनारपाडा परिसरात 80 जणांकडे ही बाईक आहे. मात्र कोणत्या ब्लॅक कलरच्या युनिकॉन गाडीचे इंडिकेटर तुटले आहे, हे कळायला मार्ग नव्हता. अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं इंडिकेटर तुटलेली एक गाडी शोधून काढली. ती गाडी अमन यादवची होती. पोलिसांनी अमन यादव याला ताब्यात घेतले.

अमन यादवला ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. अमन यादव हा प्रयागराज विद्यापीठातील विद्यार्थी आहे. तो सध्या सोनारपाडा येथील आई वडिलांकडे आला होता. दोन ठिकाणच्या सीसीटीव्हीत तो कैद झाला. मात्र त्याने अन्य किती मुलींसोबत हा प्रकार केला असावा याची माहिती नाही. कारण तक्रार पोलिसांकडे नाही. त्याचीही विकृती पाहून दिसून येते की, त्याने अनेक मुलींसोबत हा प्रकार केला असावा, असा संशय व्यक्त केला जातो आहे.

संबंधित बातम्या :

Dombivali Crime : वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने वार करुन हत्या, कारण अस्पष्ट, घटनेमुळे डोंबिवलीत खळबळ

20 गुंठे जमिनीसाठी डोंबिवलीत तरुणाची दगडाने ठेचून हत्या, चुलतभाऊ झारखंडमध्ये कसा सापडला?

बेपत्ता मुलीच्या चिंतेने ज्या बेडवर घालवली रात्र, त्यातच सापडला होता डोंबिवलीच्या स्नेहलचा मृतदेह

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.