हिंजवडी परिसरातील 18 हॉटेल, बिअर शॉपी, हुक्का पार्लवर पोलिसांकडून सील

| Updated on: May 25, 2021 | 8:21 PM

कोरोना नियमांचं उल्लंघन करुन व्यवसाय सुरु ठेवणाऱ्या 18 आस्थापना पोलिसांनी सील केल्या.

हिंजवडी परिसरातील 18 हॉटेल, बिअर शॉपी, हुक्का पार्लवर पोलिसांकडून सील
लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर हिंजवडी पोलिसांची कारवाई
Follow us on

पिंपरी चिंचवड : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अशावेळी फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लॉकडाऊनच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचं पाहायला मिळत होतं. त्या पार्श्वभूमी पोलिसांनी हॉटेल, रेस्टॉरंट्स, बार, हुक्का पार्लरवर छापेमारी केली. कोरोना नियमांचं उल्लंघन करुन व्यवसाय सुरु ठेवणाऱ्या 18 आस्थापना पोलिसांनी सील केल्या. (Hinjewadi police seals 18 hotels, bars, restaurants, beer shops violating lockdown rules)

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाटी राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि पोलीस दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, दुसरीकडे हिंजवडी परिसरात कोरोना नियमांचं उल्लंघन करुन अनेक हॉटेल, रेस्टॉरंट्स, बार, हुक्का पार्लर, बिअर शॉपी सुरु ठेवण्यात आल्या होत्या. काही जणांकडून चोरीछुपे व्यवसाय सुरु होता. अखेर पोलिसांनी आज धाडसत्र राबवलं. त्यात 18 आस्थापना सील करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदारांच्या आदेशानंतर कारवाई

लॉकडाऊनच्या काळात हॉटेल व्यवसायिकांना घरपोच सेवा आणि पार्सल सेवा सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, हिंजवडी परिसरात नियमांचं उल्लंघन सुरु होतं. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हिंजवडी-माण, पुणे-बंगळुरु महामार्ग, बावधन परिसरातील आस्थापनांवर कारवाई केली. हिंजवडी पोलिसांनी यापूर्वी मुळशी तहसीलदार यांच्याकडे कारवाईबाबत प्रस्ताव दिला होता. अखेर तहसीलदारांच्या आदेशानंतर पोलिसांनी ही धडक कारवाई केली.

कारवाई करण्यात आलेले आस्थापना

1. मोफोसा हॉटेल, बावधन
2. हॉटेल रुडलाऊंज, हिंजवडी
3. हॉटेल ठेका रेस्ट्रो लॉज, भुमकर चौक ते हिंजवडी रोड, हिंजवडी
4. हॉटेल अशोका बार अॅन्ड रेस्ट्रो, शिवाजी चौक, हिंजवडी
5. हॉटेल बॉटमअप, भटेवार नगर, हिंजवडी
6. श्री चायनीज अॅन्ड तंदुर पॉईंट, माण
7. महाराष्ट्र हॉटेल भोजनालय, मारुंजी
8. हॉटेल शिवराज, पुनावळे
9. कविता चायनिज सेंटर, मारुंजी
10. हॉटेल पुणेरी, बावधन
11. हॉटेल आस्वाद, इंदिरा कॉलेजजवळ, हिंजवडी
12. हॉटेल ग्रीनपार्क स्टॉट ऑन, बावधन
13. फॉर्च्युन डायनिंग एलएलपी उर्फ ठिकाणा हॉटेल, हिंजवडी
14. हॉटेल टिमो, चांदणी चौक
15. वॉटर – 9 मल्टिक्युझिन रेस्टॉरन्ट अॅन्ड लंच, बावधन
16. एस. पी. फॅमिली रेस्टॉरन्ट, कासारसाई
17. योगी हॉटेल, ताथवडे
18. यश करण बिअर शॉपी, हिंजवडी

संबंधित बातम्या :

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर पुण्यातील घरी चाकूहल्ला

‘पिंपरी चिंचवड मे अपनाही नाम होगा’, सराईत गुन्हेगारांना फेसबुक पोस्ट महागात, ‘भाई का बड्डे’ तुरुंगात

Hinjewadi police seals 18 hotels, bars, restaurants, beer shops violating lockdown rules