AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलासमोर व्यावसायिकाचं अपहरण, वडिलांना वाचवण्यासाठी गाडीचा पाठलाग, अवघ्या चार तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या

डोंबिवलीत पार्किगच्या जुन्या वादातून एका व्यासायिकाचं अपहरण करुन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. Dombivali kidnapping of Businessman

मुलासमोर व्यावसायिकाचं अपहरण, वडिलांना वाचवण्यासाठी गाडीचा पाठलाग, अवघ्या चार तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या
व्यावसायिकाचं अपहरण तिघांना अटक
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Edited By: Anish Bendre | Updated on: May 21, 2021 | 12:03 PM
Share

कल्याण डोंबिवली: पार्किगच्या जुन्या वादातून एका व्यासायिकाचं अपहरण करुन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना डोंबिवलीत समोर आली आहे. मानपाडा पोलीस वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला नाही तर व्यावसायिकाचा जीव गेला असता. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी सहा पैकी तीन आरोपीना अटक केलीय यामध्ये एका शिवसेना पदाधिकाऱ्याचा समावेश असल्याची माहिती आहे. पोलीस आता इतर आरोपींचा शोध घेत आहेत. (Kalyan Dombivali Manpada Police Arrested three Person for kidnapping of Businessman)

जुन्या वादातून अपहरण

डोंबिवली एमआयडीसीत रणजीत झा यांची फॅक्टरी आहे. ते दररोज दिवा बी आर नगर परिसरात असलेल्या आपला जागेवर मंदिरात पूजेसाठी जातात . काही दिवसापूर्वी गाडी पार्किगवरुन शरद शेट्टे या व्यक्तीच्या रणजीत सोबत वाद झाला बरोबर वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरुन शरद शेट्टे यांनी रणजीत याला धमकी दिली होती.

अपहरणाचा थरार

शुक्रवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास रणजीत झा फॅक्टरी बाहेर आले असता एक पांढऱ्या रंगाची कार उभी होती. या कारमधून काही तरुण उतरले. रणजीत यांना बेदम मारहाण करत कारममध्ये कोंबळे. हा प्रकार रणजीत यांचा मुलाने पाहिला. त्याने वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी गाडी सुरु केली. वडिलांना वाचवताना झा यांचा मुलगा कारसोबत फरफटत गेला. या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली.

तीन आरोपींचा शोध सुरु

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरिक्षक दादा हरी चौरे, पोलीस अधिकारी श्रीकृष्ण गोरे यांनी तपास सुरु केला. अवघ्या चार तासाच गोरे यांच्या पोलिसांच्या पथकाने आरोपींना शोधून काढले. पोलीस जेव्हा आरोपींकडे पोहचले. त्यावेळी रणजीत झा यांची स्थिती खराब होती. बेदम मारहाण केल्याने ते अर्धमेले झाले होते. वेळेत  पोलीस पोहचल्याने त्यांचा जीव वाचला. धक्कादायक म्हणजे या अपहरणाच्या घटनेत शिवसेना पदाधिकारी सुद्धा सामील होता. सध्या जखमी रणजीत आणि त्यांच्या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शिवसेना पदाधिकारी समीर मोरे, शरद शेट्टे आणि अन्य एकाला अटक केली आहे. पोलीस अन्य तीन आरोपींच्या शोधात आहेत.

संबंधित बातम्या

जावळी-महाबळेश्वरात ‘क्रेटा’मधून हवा, फिल्मी स्टाईल पाठलाग करुन गजा मारणेला सातारा पोलिसांच्या बेड्या

GST Return Filing | दर महिन्याला जीएसटी रिटर्न फाईल करण्याची चिंता मिटली, केंद्र सरकारने नियम बदलला

(Kalyan Dombivali Manpada Police Arrested three Person for kidnapping of Businessman)

Follow Us
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेचा तपास...
अभिनेता टायगर श्रॉफ प्रकरणी खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर, घटनेच्या तपासाला वेगळेच वळण
टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्या, बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर
टायगर श्रॉफच्या गाडीवर धाडधाड गोळ्या झाडल्या, पण कारण काय? बॉलिवूडची झोप उडवणारं कारण समोर!
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? भारताच्या सर्वोच्च न्यायालयात...
लडाखमधील सर्व खटले आता एकाच दिवशी? सर्वोच्च न्यायालयात... नेमका निर्णय काय?
भिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून..
Tiger shroff Video : अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा पहिला थरारक व्हिडीओ समोर; अचानक बाईकवरून आलेले तिघं...
अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
Latest Update : अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार, 3 अज्ञातांकडून... पोलिसांची माहिती काय?
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा,
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळा, इतर योजनांमधील निधी...
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार,
राहुल गांधींचा मोदी-शाहांना इशारा! ‘व्होट चोरी’चा हिशेब चुकता करणार, म्हणाले एक्सपायरी डेट जवळ आली
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना...
वनमंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वाद; राजकीय प्रतिक्रियांना उधाण
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,