AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूरच्या 19 वर्षीय तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कार

मिरज रेल्वे स्टेशन समोर कोल्हापूरच्या 19 वर्षीय तरुणीवर दोन आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. (Kolhapur Lady Gang Rape in Miraj)

कोल्हापूरच्या 19 वर्षीय तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कार
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 23, 2020 | 2:05 PM
Share

सांगली : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारीमध्ये घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र मूळ कोल्हापूरच्या 19 वर्षीय तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघा  आरोपींवर बलात्कार आणि अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Kolhapur Lady Gang Rape in Miraj)

मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील असणाऱ्या तरुणीवर सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात बलात्कार झाल्याचा आरोप आहे. आरोपींनी पीडित तरुणीला जबरदस्ती दारु पाजून तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती आहे.

मिरज रेल्वे स्टेशन समोरील मोकळ्या जागेत रात्रीच्या सुमारास 19 वर्षीय तरुणीवर दोन आरोपींनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित मागील काही दिवसापासून मिरजमध्ये मैत्रिणीसोबत राहत होती.

बलात्कार प्रकरणी सांगलीतील महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजू अच्युदन आणि अक्षय कणशेट्टी या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या महिन्यापासून सर्वत्र संचारबंदी सुरु आहे. सर्वत्र पोलिसांचा खडा पहारा असताना मोकळ्या जागेत बलात्काराच्या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : मुंबईत लॉकडाऊनमध्ये दुहेरी हत्याकांड, सख्ख्या भावांची हत्या, एक गंभीर

दरम्यान, घरगुती हिंसाचार, अत्याचार किंवा मानसिक छळ सहन करावा लागणाऱ्या महिलांना मदतीसाठी 100 हा हेल्पलाइन नंबर असल्याची आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी करुन दिली होती.

मदतीसाठी आणखी दोन हेल्पलाइन नंबर

मुंबई महापालिका आणि बिर्ला – 1800 1208 200 50

आदिवासी विभाग- 1800 102 4040 आदिवासी विभागासोबत प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुल्लही सहभागी

(Kolhapur Lady Gang Rape in Miraj)

मुंबईतही गुन्हेगारी सुरु

लॉकडाऊन असतानाही दोन दिवसांपूर्वी मुंबईत दुहेरी हत्याकांड घडलं होतं. शिवडीमध्ये दोघा सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली. मुंबईच्या रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. मैदानात बसणे आणि बाईक पार्किंगच्या वादातून सोमवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली.

मैदानात बसलेल्या मुलांवर चॉपरने हल्ला करण्यात आला. त्यामध्ये दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. मृतांपैकी एक मुलगा अल्पवयीन होता.

(Kolhapur Lady Gang Rape in Miraj)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...