21 वर्षीय नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार, शाळेतल्या मित्रासह तिघांकडून अत्याचार

21 वर्षीय नवविवाहितेवर सामूहिक बलात्कार, शाळेतल्या मित्रासह तिघांकडून अत्याचार
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या

21 वर्षीय तक्रारदार तरुणी मूळ आष्टा येथील रहिवासी आहे. दीड वर्षांपूर्वी लग्न झाल्यावर ती इंदौरमध्ये राहायला गेली. आष्टा येथील रोहित तोमर तिच्यासोबत शाळेत एकत्र शिकत होता. त्यामुळे मोबाईलवरुन दोघं एकमेकांच्या संपर्कात होते

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 21, 2021 | 8:13 AM

भोपाळ : मध्य प्रदेशातील इंदौर शहरात सामूहिक बलात्काराची घटना उधडकीस आली आहे. शाळेतील मित्राने त्याच्या आणखी दोन साथीदारांच्या मदतीने आपल्यावर गँगरेप केला, असा आरोप तरुणीने केला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेशातील इंदौर शहरातील छत्रीपुरा भागात 21 वर्षीय तक्रारदार तरुणी राहते. ती विवाहित आहे. रोहित तोमर नावाच्या तिच्या शालेय मित्राचं इंदौरमधील मंगलिया भागात घर आहे. रोहितने आपल्याला तिथे बोलावलं आणि दोघा मित्रांच्या साथीने लैंगिक अत्याचार केला, असा आरोप तिने केला आहे. त्यानंतर छत्रीपुरा पोलिसांनी रोहित तोमरला अटक केली असून त्याच्या दोन मित्रांनाही ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.

पीडिता-आरोपी शाळेपासून मित्र

21 वर्षीय तक्रारदार तरुणी मूळ आष्टा येथील रहिवासी आहे. दीड वर्षांपूर्वी लग्न झाल्यावर ती इंदौरमध्ये राहायला गेली. आष्टा येथील रोहित तोमर तिच्यासोबत शाळेत एकत्र शिकत होता. त्यामुळे मोबाईलवरुन दोघं एकमेकांच्या संपर्कात होते. नियमितपणे दोघांच्याही गप्पा व्हायच्या.

नेमकं काय घडलं?

घटनेच्या दिवशी रोहितने तिला इंद्रानगरजवळ भेटायला बोलावलं. त्यानंतर तो तिला रिक्षात बसवून मंगलिया भागातील आपल्या घरी घेऊन गेला. तिथे त्याने आपल्यावर बळजबरी केली, असा दावा पीडितेने केला आहे. त्यानंतर त्याचे आणखी दोन मित्र तिथे आले. त्यानंतर तिघांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत तिघांनी तिला तिच्या घरी सोडलं. त्यावेळी तिने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहेरी माहिती दिली. छत्रीपुरा पोलिसांनी रोहित तोमरला अटक केली असून त्याच्या दोन मित्रांचीही चौकशी सुरु केली आहे.

संबंधित बातम्या :

मॅट्रिमोनियल साईट्सवर तब्बल 41 महिलांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

उल्हासनगरात कौटुंबिक वादातून एकाची हत्या, मुख्य आरोपी फरार तर दोन महिला आरोपींना अटक

नाशकात 22 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या, बाभळीच्या झुडपात मृतदेह

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें