AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Father Murder | मित्राच्या मदतीने बापाची हत्या, आईची पोलिसात तक्रार, बारा तासात दोघे गजाआड

तरुणाने मित्राच्या मदतीने पित्याची हत्या केल्याची घटना नांदेड शहरातील धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील शंकर बोनगुलवार यांचा मृतदेह धर्माबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे रुळांवर आढळला होता,

Father Murder | मित्राच्या मदतीने बापाची हत्या, आईची पोलिसात तक्रार, बारा तासात दोघे गजाआड
आरोपी मुलगा (डावीकडे) आणि त्याचा मित्रImage Credit source: टीव्ही9
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 25, 2022 | 8:22 AM
Share

नांदेड : मित्राच्या मदतीने तरुणाने जन्मदात्या पित्याची हत्या (Father Murder) केली. नांदेडमध्ये धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Nanded Crime) ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अवघ्या बारा तासांच्या आत अटक केली आहे. तेलंगणा राज्यातील (Telangana) निर्मल जिल्ह्यातील शंकर बोनगुलवार यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर आढळला होता. मयत व्यक्तीच्या पत्नीच्या म्हणजेच आरोपीच्या आईच्या फिर्यादीवरुन या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुलगा विठ्ठल बोनगुलवार आणि त्याचा मित्र कांशीराम रॅपनवाड या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. किरकोळ घरगुती कारणावरुन ही हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

तरुणाने मित्राच्या मदतीने पित्याची हत्या केल्याची घटना नांदेड शहरातील धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील शंकर बोनगुलवार यांचा मृतदेह धर्माबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे रुळांवर आढळला होता, त्यानंतर पोलिसांनी तपास करत हत्येच्या घटनेचा छडा लावला आहे.

पत्नीच्या फिर्यादीवरुन गुन्हा

मयत शंकर बोनगुलवार यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बोनगुलवार यांचा मुलगा विठ्ठल आणि त्याचा मित्र कांशीराम रॅपनवाड या दोघांनाही अटक करण्यात आली.

किरकोळ घरगुती वादात हत्या

जन्मदात्याला संपवण्यासाठी त्याची हत्या करत रेल्वे रुळांवर त्यांचा मृतदेह टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेने नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. किरकोळ घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

संबंधित बातम्या :

 तीन आठवड्यांपासून बेपत्ता, पालघरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा कुजलेला मृतदेह सापडला

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीची हत्या, 22 वर्षीय बॉयफ्रेण्डला अटक

आमच्या घराला आग लावलेय, तरुणाचा मित्राला फोन; नवदाम्पत्यासह आठ जणांचे कोळसा झालेले मृतदेह सापडले

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...