AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora Accident MNS : मलायका जखमी झालेल्या अपघातात मनसेच्या कार्यकर्त्यांचीही गाडी, सोलापूरची ट्रॅव्हल्स असल्याची प्राथमिक माहिती

अभिनेत्री मलाईका आरोराच्या गाडीला आज मोठा अपघात झालाय. मलायका जखमी झालेल्या अपघातात मनसेच्या कार्यकर्त्यांचीही गाडी असल्याचे दिसून येत आहे. ती बस मनसेच्या कार्यक्रमाला येणारी बस दिसत आहे.

Malaika Arora Accident MNS : मलायका जखमी झालेल्या अपघातात मनसेच्या कार्यकर्त्यांचीही गाडी, सोलापूरची ट्रॅव्हल्स असल्याची प्राथमिक माहिती
मलाईका जखमी झालेल्या वाहनांमध्ये मनसेचा बॅनर असणारी गाडीImage Credit source: tv9
| Updated on: Apr 02, 2022 | 11:05 PM
Share

 रायगडअभिनेत्री मलायका आरोराच्या गाडीला (Malaika Arora Accident) आज मोठा अपघात झालाय. मलायका जखमी झालेल्या अपघातात मनसेच्या कार्यकर्त्यांचीही (MNS) गाडी असल्याचे दिसून येत आहे. ती बस मनसेच्या कार्यक्रमाला (Mns melava) येणारी बस दिसत आहे. कारण या गाडीवर मनसेचा बॅनर दिसत आहे. या अपघाताचे खळबळजनक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या अपघात तीन गाड्या एकमेकांना धडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात मनसेच्या गाडीलाही चांगलचं डॅमेज झालं आहे. पण त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनीच मलाईकाला रुग्णालयात दाखल करण्यास मनसेच्या कार्यकर्त्यांनीच मदत केल्याचाही व्हिडिओ समोर आली आहे. मलाईकाला अपघातानंतर उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर मलायकाच्या बाजुने कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

अपघातात तीन वाहनांचं नुकसान

पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून हा अपघात कसा घडला याचा तपास करून एफआयआर नोंदवला जाईल. “मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला. या अपघातात तीन वाहनं एकमेकांवर आदळली आणि तिन्ही वाहनांचे नुकसान झाले. यात मनसेच्या गाडीचेही मोठं नुकासन झालं आहे. हा अपघात एवढा भयंकर होता की यात मलाईकाच्या गाडीच्या मागच्या सर्व काचा फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मलायकाचे सिटी स्कॅन

मलायकाला सध्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून तिचे सिटी स्कॅन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तिला पुढेचे काही तास निरिक्षणात ठेवणार असल्याचाही माहिती समोर आली आहे. तिला या अपघातात किती दुखापत झाली आहे. याबाबत कोणतीही ठोस माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र लवकर डॉक्टर याबाबत अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे. खालापूर टोलनाक्याजवळ हा अपघात झाला आहे. अचानक ब्रेक लागल्याने तीन गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघात मलायकाच्या ड्राईव्हरला आणि बॉडिगार्डला मात्र सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. आज मुंबईत मनसेचा मेळावा होता, त्यासाठी सकाळपासून राज्यभरातून मनसचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होत होते. त्यावेळी त्यांचीही गाडी या अपगाताच्या ठिकाणी दिसून आली आहे.

अपघातानंतरचा व्हिडिओ

Malaika Arora Accident : मलायका अरोराचा खोपोलीत अपघात, थोडक्यात बचावली, तीन-चार गाड्या आदळल्या

Nagpur Crime | दारुड्याचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न, रॉकेल ओतून लावली आग, प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ

Firing : लष्कराच्या जवानाकडून चुकून गोळीबार, दोन नागरिक जखमी; अरुणाचल प्रदेशातील खळबळजनक घटना

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.