Viral News: गावठी कोंबडीची अंडी खाल्ल्याने गावकरी आजारी, रुग्णालयात गर्दी, मग…

गावठी कोंबडीचं रसरशीत चिकन आणि ताडीची पार्टी, ग्रामीण रुग्णालय भरलं, डॉक्टर चिंतेत

Viral News: गावठी कोंबडीची अंडी खाल्ल्याने गावकरी आजारी, रुग्णालयात गर्दी, मग...
गावठी कोंबडीची अंडी खाल्ल्याने अनेक गावकरी आजारी
Image Credit source: twitter
| Updated on: Jan 07, 2023 | 2:29 PM

छत्तीसगड : छत्तीसगड राज्यातील पालनार (Palnaar) या जिल्ह्यात 11 लोकांना गावठी कोंबडी (Village chicken) आणि ताडीची पार्टी झाल्यानंतर त्रास सुरु झाला आहे. विशेष म्हणजे त्यापैकी एका पंधरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. आजारी पडलेले सगळे गावातील कामगार आहेत. नकुलनार (Nakulnaar) या भागात सगळे कामगार मजूरीसाठी गेले होते. मागच्या काही दिवसांपासून ते तिथचं काम करीत आहेत. ही घटना दोन दिवसापुर्वी घडली आहे. ज्या लोकांना त्रास होत आहे, त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पंधरा वर्षाच्या मुलाची तब्येत अधिक बिघडली होती. त्याला रुग्णालयात तातडीने घेऊन जाण्याचं नियोजन सुरु होतं. परंतु त्याचवेळी त्याचा घरात मृत्यू झाला. सध्या दहा लोकांवरती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत सुध्दा गंभीर आहे. डॉक्टरांनी अन्नामध्ये विषाणू घटक असल्यामुळे लोकांना त्रास झाल्याचं सांगितलं आहे.

डॉक्टर बीआर पुजारी यांनी सांगितलं की, त्यांना फोनवरुन तब्येत खराब असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यापैकी सहा रुग्णांची तब्येत बरी आहे, तर चार जणांची तब्येत गंभीर असल्याचे सांगितले आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हणाले की, कामगारांनी गावठी कोंबडीचं मटन आणि अंडी खाल्ली होती. त्याचबरोबर त्यांनी ताडीचं सुध्दा सेवन केलं होतं. त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. नेमका हा प्रकार कशामुळे झाला, त्याची आम्ही चौकशी करीत आहोत.