AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलिया भट्ट पोटात असताना आईने एका दिवसात ओढल्या होत्या तब्बल 100 सिगारेट; स्वत:च केला खुलासा

अभिनेत्री सोनी राजदान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या दोन्ही प्रेग्नन्सीदरम्यानच्या कामाचा अनुभव सांगितला. आलिया भट्ट जेव्हा पोटात होती, तेव्हा एका सीनसाठी त्यांनी तब्बल 100 सिगारेट ओढल्या होत्या.

आलिया भट्ट पोटात असताना आईने एका दिवसात ओढल्या होत्या तब्बल 100 सिगारेट; स्वत:च केला खुलासा
Soni Razdan and Alia BhattImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 16, 2026 | 1:01 PM
Share

अभिनेत्री आलिया भट्टची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री सोनी राजदान यांनी नुकताच त्यांच्या आयुष्यातील एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे. आलियाच्या जन्माआधीचा हा किस्सा ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आलिया भट्ट पोटात असताना सोनी राजदान यांनी एका दिवसात तब्बल 100 सिगारेट ओढल्या होत्या. विशेष म्हणजे, त्यावेळी आपण प्रेग्नंट असल्याची त्यांना कल्पनाच नव्हती. एका चित्रपटातील स्मोकिंग सीनच्या शूटिंगदरम्यान हा प्रकार घडला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे.

‘गुमराह’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडला प्रकार

सोनी राजदान यांनी ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या दोन्ही प्रेग्नन्सीदरम्यानच्या कामाच्या अनुभवांबद्दल सांगितलं. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या महेश भट्ट दिग्दर्शित ‘गुमराह’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्या दुसऱ्यांदा प्रेग्नंट होत्या. मात्र, त्यावेळी त्यांना याची माहिती नव्हती. चित्रपटातील एका स्मोकिंग सीनसाठी त्यांना वारंवार सिगारेट ओढावी लागली होती. याबद्दल सांगताना सोनी म्हणाल्या, “मी त्या स्मोकिंग सीनचं शूटिंग करत होते. त्यावेळी एका दिवसात मी जवळपास 100 सिगारेट ओढल्या असतील. माझ्या पोटात आलिया आहे, याची मला अजिबात कल्पना नव्हती. मी मुळात सिगारेट ओढत नाही. मात्र, त्या दिवसानंतर मला सिगारेटची तल्लफ जाणवू लागली होती.”

प्रेग्नन्सीमध्ये केला होता तो सीन

सोनी यांनी याच चित्रपटातील आणखी एका कठीण प्रसंगाची आठवण सांगितली. आलिया पोटात असतानाच त्यांनी चित्रपटातील फाशीच्या दृश्याचं शूटिंग केलं होतं. त्यानंतर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये जवळपास पाच महिन्यांचा ब्रेक आला. जेव्हा त्या पुन्हा सेटवर परतल्या, तेव्हा त्यांच्या शरीरात झालेले बदल स्पष्टपणे दिसू लागले होते. त्यांनी सांगितलं की, पाच महिन्यांनंतर सेटवर परतल्यावर त्यांचे जुने कॉस्ट्यूम त्यांना फिट होत नव्हते. पोट थोडं दिसू लागल्यामुळे निर्मात्यांना त्यांच्या कपड्यांमध्ये बदल करावे लागले.

View this post on Instagram

A post shared by Soni Razdan (@sonirazdan)

पहिल्या प्रेग्नन्सीदरम्यानही सुरू होतं शूटिंग

सोनी राजदान यांनी पहिल्यांदा आई होण्याचा अनुभवही सांगितला. 1986 मध्ये प्रसारित झालेल्या ‘बुनियाद’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्या पहिल्यांदा प्रेग्नंट झाल्या होत्या. त्यावेळी रमेश सिप्पी आणि ज्योती स्वरूप यांनी त्यांची विशेष काळजी घेतली होती. सकाळी लवकर शूटिंगला जाण्यासाठी त्यांना गाडी उपलब्ध करून दिली जात होती. सेटवरही त्यांच्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात आली होती. 1988 मध्ये सोनी आणि महेश भट्ट यांच्या घरी पहिली मुलगी शाहीनचा जन्म झाला. त्यानंतर 1993 मध्ये आलियाचा जन्म झाला.

या मुलाखतीत सोनी यांनी पूर्वीच्या आणि आताच्या मनोरंजनविश्वातील बदलांवरही भाष्य केलं. पूर्वी अभिनेत्री आई होणार असल्याची बातमी निर्मात्यांपासून लपवून ठेवावी लागत होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. आलियाला आई असल्याचं लपवण्याची गरज नाही, याचा आपल्याला आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं.

Follow Us
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!