AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Kapoor: शरद कपूरचा व्हिडीओ पाहाताच सलमानने केला थेट फोन, म्हणाला…

Sharad Kapoor: अभिनेते शरद कपूर हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यावर बिकट परिस्थिती ओढावल्याचे सांगितले. आता सलमान खानने त्यांना फोन केला. नेमकं काय म्हणाला वाचा...

Sharad Kapoor: शरद कपूरचा व्हिडीओ पाहाताच सलमानने केला थेट फोन, म्हणाला...
Sharad kapoorImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 16, 2026 | 12:50 PM
Share

बॉलिवूड अभिनेते शरद कपूर सध्या आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे कठीण काळातून जात आहेत. गेल्या काही वर्षांत आजारपण आणि गंभीर शारीरिक जखमांमुळे त्यांना अभिनयाच्या जगापासून दूर राहावे लागले आहे. या कठीण काळात बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि सोनू सूद त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. दोन्ही कलाकारांनी शरद कपूरला या कठीण काळातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.

सलमान खानने विचारले हाल, आर्थिक मदतही केली

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने शरद कपूरशी संपर्क साधून त्यांच्या तब्येतीबद्दल माहिती घेतली. सोबतच त्यांनी अभिनेत्याला आर्थिक मदत देण्याची ऑफरही दिली आहे. तर सोनू सूद यांनी त्यांच्या वैद्यकीय उपचाराची जबाबदारी घेण्याचा पुढाकार घेतला आहे. त्यांनी शरद कपूरच्या उपचारासाठी डॉक्टर आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत केली आहे.

आजारपण आणि जखमेमुळे वाढल्या अडचणी

शरद कपूरच्या एका जवळच्या मित्रानुसार अभिनेते गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जात आहेत. त्यांना मेंदूशी संबंधित समस्यांसोबत पायालाही गंभीर जखम झाली होती. सांगितले जाते की बार्सलोनामध्ये फुटबॉल खेळताना त्यांच्या पायात जखम झाली होती, त्यानंतर त्यांच्या शारीरिक समस्या खूप वाढल्या.

सोनू सूदने देखील केली मदत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनू १५ नोव्हेंबरच्या संध्याकाळी शरदला भेटणार होते. या भेटीत दोघांमध्ये कोणत्याही चित्रपट किंवा नवीन प्रकल्पासंबंधी चर्चा होऊ शकते. याशिवाय सोनूने शरद यांच्यासाठी आवश्यक वैद्यकीय सामानाचीही व्यवस्था केली आहे. एका रिपोर्टनुसार सोनू सतत शरदच्या आरोग्य आणि गरजांची माहिती घेत आहे. तर दुसऱ्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की शरदच्या पायाच्या उपचारासाठी डॉक्टरांच्या एका टीमचीही व्यवस्था केली जात आहे. पण सोनू आणि शरद भेटले आहेत की नाही याची कोणतीही निश्चित माहिती नाही.

Follow Us
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!