AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाने पालक गमावलेल्या लेकरांना दत्तक देण्याच्या सोशल मीडिया पोस्ट, यशोमती ठाकूर गरजल्या

काही समाजकंटक याचा वापर संधी म्हणून करत परस्पर मुलांची विक्री करत असल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे (Minister Yashomati Thakur adoption of orphan kids)

कोरोनाने पालक गमावलेल्या लेकरांना दत्तक देण्याच्या सोशल मीडिया पोस्ट, यशोमती ठाकूर गरजल्या
Minister Yashomati Thakur
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: May 04, 2021 | 12:31 PM
Share

मुंबई : कोव्हिड19 च्या आजारात दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक किंवा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचे सोशल मीडियावरील पोस्टमधून दिसत आहे. समाज कंटकांकडून अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना गंभीर आहेत. त्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी दिला आहे. (Minister Yashomati Thakur warns over Viral Social Media post on adoption of orphan kids due to COVID)

अशा घटनांना रोखण्यासाठी त्याची माहिती मिळाल्यास 1098 या हेल्पलाईनशी संपर्क साधावा. किंवा सारा महाराष्ट्रच्या (स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजन्सी) 8329041531 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन महिला आणि बालविकास आयुक्तालयाने केले आहे. समाजकंटकांकडून अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना गंभीर असून त्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही विभागाने कळवले आहे.

दोन्ही पालकांच्या मृत्यूमुळे मुलं अनाथ

कोरोना परिस्थितीत इतर अनेक समस्यांबरोबर बालकांच्या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या बालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह यासारख्या समस्यांसोबतच कोव्हिड-19 मुळे दोन्ही पालकांच्या मृत्यूमुळे अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. अशा बालकांचा काही वेळा आप्तस्वकीयांकडून स्वीकार न झाल्यामुळे या समस्यांमध्ये अधिकच भर पडत आहे.

सोशल मीडियावर पोस्ट्सचा सुळसुळाट

एकीकडे अशा बालकांचा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करत असून काही समाजकंटक या समस्येचा वापर संधी म्हणून करुन घेत परस्पर मुलांची विक्री करत असल्याचे चित्र समाजमाध्यमांवरील पोस्टवरुन दिसून येत आहे. यासाठी फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी समाजमाध्यमांचा वापर करून त्यावर विविध भावनात्मक पोस्ट टाकल्या जात आहेत. बालके दत्तकास उपलब्ध आहेत असे चित्र निर्माण केले जात आहे.

हे समाजकंटक बालकांची विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु अशा प्रकारे बालकांना परस्पर दत्तक घेणे- देणे वा खरेदी-विक्री केली करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. अशाप्रकारचे कृत्य करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम, 2015 तसेच दत्तक नियमावली, 2017 नुसार कठोर कारवाई कारवाईस पात्र आहे.

बालविकास विभागाकडून हेल्पलाईन नंबर जारी

राज्यात कोठेही कोव्हिड-19 च्या कारणाने पालक गमावल्यामुळे अनाथ झालेली बालके आढळून आल्यास 1098 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा अथवा सारा महाराष्ट्र (स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजन्सी) च्या 8329041531 या क्रमांकावर कळवावे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती, व पोलीस यंत्रणेशी त्वरित संपर्क साधून या बालकांना ताब्यात द्यावे. त्याची शासनामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल. (Minister Yashomati Thakur adoption of orphan kids)

ज्या पालकांना बालक दत्तक घ्यावयाचे आहे अशा पालकांसाठी कायदेशीर दत्तक विधान प्रक्रियेची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या ‘कारा’ (सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी) या प्राधिकरणाच्या www.cara.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्या आधारे हे पालक दत्तकासाठी अर्ज नोंदणी करू शकतात, असेही महिला व बालविकास विभागाने कळवले आहे

संबंधित बातम्या :

बाळांनो, आम्ही लगेच येतो, कोरोना उपचाराला गेलेले दाम्पत्य परतलेच नाही, चिमुकल्यांना आई-बाप गेल्याचा पत्ताच नाही!

अमरावतीत रुग्ण संख्या घटली, मग लॉकडाऊन का?, आकडेवारी देत यशोमती ठाकूर यांनी आघाडी सरकारला हाणले

(Minister Yashomati Thakur warns over Viral Social Media post on adoption of orphan kids due to COVID)

Follow Us
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं.

इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल.

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स.

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?.

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं.

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस.

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस