AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉयफ्रेंडसोबत मजा करायचीय, संपत्तीच्या लोभापोटी अल्पवयीन नातीकडून आजीचीच हत्या, वाचा थरार

नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत निवृत्त महिलेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे (Minor girl killed her grandmother for property)

बॉयफ्रेंडसोबत मजा करायचीय, संपत्तीच्या लोभापोटी अल्पवयीन नातीकडून आजीचीच हत्या, वाचा थरार
| Updated on: May 20, 2021 | 9:24 PM
Share

नागपूर : नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत निवृत्त महिलेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. महिलेच्या नातीनेच तिचा बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्राच्या मदतीने हत्या केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी बॉयफ्रेंड आणि त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतलं आहे. मात्र, नात अजूनही फरार आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच नातीनेच आजीचा गळा चिरुन हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे (Minor girl killed her grandmother for property).

नेमकं प्रकरण काय?

नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सप्तक नगरात 62 वर्षीय वृद्धेची हत्या करण्यात आल्याची घटना 14 मे रोजी पुढे आली होती. विजयाबाई पांडुरंग तिवलकर असे मृतक महिलेचे नाव आहे. त्या सेवानिवृत्त असून एकट्याच राहत होत्या. त्या राज्य राखीव पोलीस दलातून निवृत्त झाल्या होत्या. त्यांचा एक मुलगा हा देखील एसआरपीएफमध्ये कार्यरत आहे. त्याची पोस्टिंग हिंगणा येथे आहे. मात्र मृतक विजया या मुलासोबत राहत नसून वेगळ्या राहायच्या (Minor girl killed her grandmother for property).

घरकाम महिलेमुळे हत्येची घटना उघड

हत्येच्या आधल्या दिवशी विजया शेजारच्यांसोबत बोलल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत विजया घराबाहेर पडल्या नव्हत्या. दुपारच्या वेळात त्यांच्याकडे काम करणारी महिला घरी आली असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या. घरकाम करणाऱ्या महिलेने या संदर्भात शेजारच्या लोकांना सूचना दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना देखील माहिती कळवण्यात आली.

पोलिसांकडून तपास

मृतक विजया यांचा गळा चिरण्यात आला होता. तसेच त्यांच्या डोक्यावर देखील जखमा आढळून आल्या होत्या. मृतक महिलेच्या घरातील महागड्या वस्तू आणि अंगावरील दागिने जशास तसे असल्याने चोरीच्या उद्देशाने त्यांचा खून झाला नसावा, असा अंदाज पोलिसांनी लावला होता.

आजीच्या संपत्तीवर मौज करण्यासाठी नातेकडून हत्या

पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली. महिलेच्या अल्पवयीन नातीने आजीकडे असलेला पैसे आणि संपत्तीच्या लोभापोटी हे घडवून आल्याचं समोर आलं आहे. आजीचा पैसा आणि संपत्तीवर आपल्याला मौज करता येईल हा उद्देश ठेऊन ही हत्या केली असल्याचे उघड झालं आहे.

संबंधित घटना :

घरातील महागड्या वस्तू, अंगावरील दागिने जशास तसे, तरीही वृद्ध महिला रक्ताच्या थारोळ्यात, आरोपींनी महिलेला का मारलं?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.