AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहारमध्ये भर दिवसा महिला मॉडेलवर गोळीबार, मोना रायची प्राणज्योत मालवली, हत्येमागील रहस्य रहस्यच राहिल?

बिहारमध्ये प्रसिद्ध मॉडेल मोना रायचा मृत्यू झाला आहे. मोनाची गेल्या पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरु होती. पण मोनाचा आज (17 ऑक्टोबर) पहाटे चार वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

बिहारमध्ये भर दिवसा महिला मॉडेलवर गोळीबार, मोना रायची प्राणज्योत मालवली, हत्येमागील रहस्य रहस्यच राहिल?
बिहारमध्ये मॉडेल मोना रायची हत्या
| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 4:29 PM
Share

पाटणा : बिहारमध्ये प्रसिद्ध मॉडेल मोना रायचा मृत्यू झाला आहे. मोनाची गेल्या पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरु होती. पण मोनाचा आज (17 ऑक्टोबर) पहाटे चार वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. मोनावर पाच दिवसांपूर्वी अज्ञात आरोपींनी गोळीबार केला होता. तिच्या हत्येमागील नेमकं रहस्य काय होतं? ते अद्याप उलगडलेलं नाही. मोनाच्या मृत्यूमागे काहीतरी मोठं रहस्य दडल्याची चर्चा परिसरात आहे. पण पोलीस अद्याप एकाही आरोपीला पकडू शकलेले नाहीत.

नेमकं प्रकरण काय?

बिहारची राजधानी असलेल्या पाटणा शहरात मंगळवारी (12 ऑक्टोबर) भयानक घटना घडली. भर दिवसा बाईकवर आलेल्या दोन अज्ञात आरोपींनी 32 वर्षीय महिला मॉडेल अनिता देवी उर्फ मोना रॉय हिच्यावर गोळ्या झाडल्या. संबंधित घटना ही शहरातील राजीव नगर पोलीस ठाणे क्षेत्रातील रामनगरी येथील बसंत कॉलनीत घडली. आरोपी गोळीबारानंतर पसार झाले. यावेळी मोना राय सोबत तिची मुलगी देखील होती. तिने आरडोओरड केल्यानंतर मोना रायला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मोनाची गेल्या पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरु होती. मात्र, आज (17 ऑक्टोबर) पहाटे मोनाची मृत्यूशी झुंज अयशस्वी ठरली. मोनाच्या मृत्यूसोबत अनेक रहस्य दफन झाल्याची चर्चा सुरु आहे.

माझी कुणाशीही दुश्मनी नाही, पीडितेच्या पतीची प्रतिक्रिया

मोना राय ही टिक-टॉक स्टार होती. तिला टिक-टॉकवर चांगली प्रसिद्धी मिळाली. याशिवाय मोनाने अनेक भोजपुरी अल्बममध्ये काम केलं आहे. याशिवाय गेल्या एक वर्षांपासून ती मॉडेलिंग क्षेत्रात आपलं नशिब आजमत होती. तिचा पती हा एका खासगी कंपनीत काम करतो. पण आपली कुणासोबतही दुश्मनी नाही, अशी प्रतिक्रिया पतीने दिली आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर खुलासा करावा, अशी मागणी पीडितेच्या पतीने केली आहे.

पाटणा पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरीक पाटणा पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. नवरात्रीच्या दिवसांमध्ये रस्त्यावर एवढी रहदारी असताना एका महिलेवर गोळीबार कसा होऊ शकतो? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे घटनेला 5 दिवस उलटून गेल्यानंतरी पोलिसांनी अद्याप कुणाला अटक केलेली नाही.

पुराव्याअभावी सुटलेल्या कुख्यात गुंडाची हत्या

दुसरीकडे महाराष्ट्राच्या नागपूर शहरात एका कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या जुनी शुक्रवारी परिसरात महिन्याभरापूर्वी कुख्यात गुंडाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी रात्री ही थरारक घटना घडली. हत्या करुन मारेकरी फरार झाले आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.

2016 मधील एका हत्याकांडात पुराव्या अभावी गमछु नावाच्या गुंडाची निर्दोष मुक्तता झाली होती. गुंडाचा काही जणांशी वाद सुरु होता, त्यातून ही हत्या झाली असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. नागपूरच्या जुनी शुक्रवारी परिसरात गमछूची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले आहेत. पोलिसांनी हत्या प्रकरणाचा तपास सुरु करुन आरोपींचा शोध चालू केला आहे.

हेही वाचा :

क्या हुआ तेरा वादा? अनेक वर्ष शारीरिक संबंध, पण लग्नाच्यावेळी पाठ दाखवली, पीडितेची मन हेलावणारी कहाणी

प्रसूती होताना ओरडतेस का?, म्हणत गरोदर महिलेला डॉक्टरकडून अमानुष मारहाण, दौंडमधील संतापजनक घटना

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.