AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aryan Khan Drugs Case | 25 कोटींचं खंडणी प्रकरण, शाहरुखच्या मॅनेजरचं सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या हाती

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान संबंधित ड्रग्ज प्रकरणात 25 कोटींच्या खंडणीचा आरोप एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर ठेवण्यात आला होता. त्याप्रकरणात आता एक मोठा खुलासा झाला आहे. शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानीचं एक सीसीटीव्ही फुटेज आता पुढे आलं आहे.

Aryan Khan Drugs Case | 25 कोटींचं खंडणी प्रकरण, शाहरुखच्या मॅनेजरचं सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या हाती
Puja Dadlani
| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 9:52 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान संबंधित ड्रग्ज प्रकरणात 25 कोटींच्या खंडणीचा आरोप एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर ठेवण्यात आला होता. त्याप्रकरणात आता एक मोठा खुलासा झाला आहे. शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानीचं एक सीसीटीव्ही फुटेज आता पुढे आलं आहे.

एसआयटीच्या पथकाच्या हाती पुजा ददलानीचं सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुंबईच्या लोअर परळमध्ये पुजा ददलानीची कार दिसून आली आहे. लोअर परळमध्येच ही 25 कोटींची डील झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलीस पुजा ददलानी आणि आर्यन खानचा जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. तर गोसावीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे.

25 कोटींच्या खंडणीची डील ही सॅम डिसुझा, पुजा ददलानी आणि आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावी यांच्यात झाल्याची माहिती आहे. यावेळी डील करताना गोसावीने पुजाला मदत करण्याचं सांगितलं होतं, असा आरोप पंच प्रभाकर साईलने गोसावीवर केले आहे.

सॅम डिसुझाचा पुजा ददलानीवर आरोप

सॅम डिसूझाने एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत दावा केला आहे की शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानीने आर्यनला अटकेपासून वाचवण्यासाठी मोठी रक्कम ऑफर केली होती. जेव्हा पुजाने एवढी मोठी रक्कम दिली, तेव्हा तिला वाटले होते की ती आर्यनला वाचवू शकेल. पण, जेव्हा हे शक्य झाले नाही तेव्हा ही रक्कम तिला परत करण्यात आली.

पेशाने व्यावसायिक असलेल्या सॅम डिसुझा यांचा दावा आहे की पुजा ददलानीने या खटल्यातील साक्षीदार केपी गोसावी यांना 50 लाख रुपये दिले होते. सॅमने सांगितले की, गोसावीची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पुजाला पैसे परत केले.

केपी गोसावी, पूजा ददलानी आणि सॅम डिसुझा यांची भेट 3 ऑक्टोबरला सकाळी झाल्याचे प्रभाकर साईल यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. कारमध्ये एक व्यक्ती आला आणि त्याने प्रभाकर साईल यांना दोन बॅग दिल्या. ज्या त्याने सॅम डिसुझाजवळील ट्रायडंट हॉटेलमध्ये नेल्या.

यानंतर डिसुझा यांनी त्या पिशव्यांमध्ये ठेवलेले पैसे मोजले, ते फक्त 38 लाख रुपये होते. प्रभाकरने असाही दावा केलाय की, गोसावी यांचे संभाषण आपण ऐकले असून त्यात तो 25 कोटी रुपयांची मागणी करत होता आणि त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडे यांना द्यायचे होते.

संबंधित बातम्या :

Aryan Khan Drugs Case | आर्यनच्या जामीनाविरोधात NCB, पुरव्यांशी छेडछाडीचा दावा, मॅनेजर पूजा ददलानीचेही नाव समोर!

Aryan Khan Bail Conditions | तुरुंगाबाहेर पण ‘आझाद’ नाही,… तर आर्यन खानचा पासपोर्टही जप्त होणार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.