AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत भररस्त्यात वकिलावर तलवारीचे वार, 9 आरोपींना अटक

18 जुलै रोजी बोरिवली पश्चिमेला कांदरपाडा भागात ही घटना घडली होती. तलवार हल्ल्यात वकील सत्यदेव जोशी गंभीर जखमी झाले. हल्ल्याची दृश्यं मोबाईल कॅमेरात रेकॉर्ड झाली आहेत.

मुंबईत भररस्त्यात वकिलावर तलवारीचे वार, 9 आरोपींना अटक
मुंबईत वकिलावर तलवार हल्ला
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 10:54 AM
Share

मुंबई : मुंबईतील दहिसर-बोरिवली भागात वकिलावर तलवार हल्ला केल्याप्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सत्यदेव जोशी यांना भररस्त्यात मारहाण करुन तलवारीने वार करण्यात आले होते. या प्रकरणी आधी तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यानंतर आणखी सहा जणांना अटक करण्यात आली असून आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार आहे. तलवार हल्ल्याची घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

18 जुलै रोजी बोरिवली पश्चिमेला कांदरपाडा भागात ही घटना घडली होती. तलवार हल्ल्यात वकील सत्यदेव जोशी गंभीर जखमी झाले.  एमएचबी पोलिसांनी या प्रकरणी कलम 307, 326,324, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. वकिलावर झालेल्या तलवार हल्ल्याची दृश्यं मोबाईल कॅमेरात रेकॉर्ड झाली आहेत.

हल्ल्याची दृश्यं :

उस्मानाबादेत डॉक्टरचा वकिलावर हल्ला

दुसरीकडे, न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यामधील वकीलपत्र सोडून दे, अन्यथा जीव घेऊ, अशी धमकी देत उस्मानाबादमध्ये वकिलावर डॉक्टरने जीवघेणा हल्ला केला होता. वकील प्रथमेश मोहिते यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी डॉ अरुण मोरे यांच्यासह 3 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोहिते हे डॉ. मोरेंचे मेहुणे असल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | मुंबईत भररस्त्यावर वकिलावर तलवारीचे वार, हल्ल्याची दृश्यं कॅमेरात कैद

डॉक्टर दाम्पत्याच्या घटस्फोटाचा खटला, वकील मेव्हण्यावर जीवघेणा हल्ला, डॉक्टर पतीसह तिघे पसार

(Mumbai Lawyer attacked by sword at Borivali Dahisar 9 arrested)

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....