AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाशी खाडी पुलावरुन आत्महत्येचा प्रयत्न, वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने तरुण बचावला

नवी मुंबईतील आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवणारे वाहतूक पोलीस शहाजी फटांगरे, राजेंद्र दांडेकर यांचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केलं.

वाशी खाडी पुलावरुन आत्महत्येचा प्रयत्न, वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने तरुण बचावला
Vashi Creek Flyover
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 16, 2021 | 2:58 PM
Share

नवी मुंबई : वाशी खाडी पुलावरुन (Vashi Creek Flyover) उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यात यश आलं आहे. नवी मुंबईतील वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत कोळी बांधवांच्या मदतीने या व्यक्तीचे प्राण वाचवले. सध्या त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नवी मुंबईत राहणारी संबंधित व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले होते. नेरुळ भागात राहणाऱ्या या व्यक्तीने वाशी खाडी पुलावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज (शुक्रवारी) सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

वाहतूक पोलिस शहाजी फटांगरे, राजेंद्र दांडेकर यांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पाहिले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने हालचाली करत धाव घेतली. त्यानंतर कोळी बांधवांच्या मदतीने या व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आले.

रुग्णालयात उपचार सुरु

दरम्यान, नवी मुंबईतील महापालिका रुग्णालयात संबंधित व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. या व्यक्तीचे प्राण वाचवणारे वाहतूक पोलीस शहाजी फटांगरे, राजेंद्र दांडेकर यांचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केलं.

आंबोलीत खोल दरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वीच, सिंधुदुर्गातील आंबोलीत खोल दरीत उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवतीला रेस्क्यू टीमने जीवदान दिलं. रिक्षा चालकाच्या प्रसंगावधानामुळे 24 वर्षीय तरुणीचा जीव वाचला. तरुणीने जवळपास दोनशे फूट खोल दरीत उडी घेतली होती. मात्र वेळीच मदत मिळाल्यामुळे तिला दरीतून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.

संबंधित बातम्या 

प्रेयसीचं लग्न ठरल्याने नाराजी, नायर रुग्णालयातील 26 वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येचं गूढ उकललं

आंबोलीत 24 वर्षीय तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, रिक्षाचालकाचे प्रसंगावधान, दोनशे फूट खोल दरीतून बचाव

(Navi Mumbai Man attempts Suicide by jumping from Vashi Creek Flyover)

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश