AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींचा ईडी कोठडीत मुक्काम वाढला

फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता.

एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींचा ईडी कोठडीत मुक्काम वाढला
एकनाथ खडसे
Reporter Sudhakar Kashyap
Reporter Sudhakar Kashyap | Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 07, 2021 | 3:01 PM
Share

मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी (Pune Bhosari MIDC Land Scam) अटकेत असलेल्या गिरीश चौधरी (Girish Chaudhari) यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. चौधरी हे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली होती. आता 12 जुलैपर्यंत त्यांचा मुक्काम अंमलबजावणी संचलनालयाच्या कोठडीत असेल. (Pune Bhosari MIDC Land Scam NCP Leader Eknath Khadse Son in Law Girish Chaudhari ED Custody till 12th July)

एकनाथ खडसेंवर अटकेची टांगती तलवार?

ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती. दुसरीकडे, “भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीचा तपास हा योग्य दिशेने सुरु आहे. गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर आता स्वतः एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही अटक होण्याची शक्यता आहे” असं मत अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे (Adv Asim Sarode) यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे खडसेंचं टेंशन वाढण्याची शक्यता आहे.

काय आहे भोसरी जमीन घोटाळा?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.

संबंधित बातम्या :

“जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यता”

भोसरी जमीन घोटाळा, एकनाथ खडसेंना मोठा दणका, जावई गिरीश चौधरींना ईडीची अटक

(Pune Bhosari MIDC Land Scam NCP Leader Eknath Khadse Son in Law Girish Chaudhari ED Custody till 12th July)

Follow Us
KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार,
KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार, चक्क... धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी..
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी; थेट...
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... बड्या नेत्याचं विधान
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... पुन्हा बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री?
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीत...
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना सूचना
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना महत्त्वाच्या सूचना... मोठी अपडेट समोर
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश