AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | रॉयल एनफिल्डच्या शोरुमचे शटर वाकवून आत शिरला, बदलापुरात धाडसी चोरी

बदलापूरच्या कात्रप परिसरातील हायवेवर रॉयल एनफिल्ड ही दुचाकींची शोरुम आहे. मध्यरात्रीच्या वेळेस चोरट्याने शटर वाकवून आत शिरत चोरी केली

VIDEO | रॉयल एनफिल्डच्या शोरुमचे शटर वाकवून आत शिरला, बदलापुरात धाडसी चोरी
बदलापूर रॉयल एन्फिल्ड शोरुममधील चोरी सीसीटीव्हीत कैद झाली होती
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jun 16, 2021 | 8:31 AM
Share

बदलापूर : मुंबईलगतच्या बदलापूर भागात रॉयल एनफिल्डच्या शोरुममध्ये चोरी झाल्याची घटना घडली. सोमवारी मध्यरात्री ही चोरी झाली. चोरट्यांनी आयपॅड, मोबाईल, टीशर्ट आणि जॅकेट असा मुद्देमाल लंपास केला. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाली आहे. (Thane Badlapur Royal Enfield Bike Showroom Robbery)

बदलापूरच्या कात्रप परिसरातील हायवेवर रॉयल एनफिल्ड ही दुचाकींची शोरुम आहे. सोमवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास एक चोरटा या शोरुममध्ये शटर वाकवून घुसला. त्याने शोरुममधील तीन आयपॅड, एक मोबाईल, टीशर्ट आणि जॅकेट असा मुद्देमाल चोरुन नेला.

चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाली आहे. सकाळी ही घटना मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या लक्षात आली. दुकानाचे वाकलेले शटर पाहून त्यांनी ही बाब पोलिसांना कळवली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.

वाहत्या रस्त्यावरील शोरुम

महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शोरुम कल्याण-कर्जत राज्य महामार्ग या मुख्य रस्त्यावर असून रात्री उशिरासुद्धा या रस्त्यावरुन वाहतूक सुरु असते. मात्र तरीही चोरट्यांनी केलेली हिंमत पाहता इतर दुकानदारांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे.

पाहा व्हिडीओ :

कुख्यात दरोडेखोरांची टोळी गजाआड

दुसरीकडे, मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अन्वेषण शाखा तीनने  सोमवारी रात्री सापळा रचून देशभर धुमाकूळ घातलेल्या आणि गोडासन या आंतरराष्ट्रीय चोरी आणि दरोड्यासाठी कुख्यात असलेल्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे. तर एक जण फरार आहे. ही टोळी भिकाऱ्याचा वेशात दुकानाबाहेर रेकी करायची. नंतर मध्यरात्री दरोडा टाकायची.

टोळी नालासोपाऱ्यातील संतोष भुवन या परिसरातील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकणासाठी येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी (14 जून) रात्री 12 च्या सुमारास सापळा रचत या टोळीला अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून मिरची पावडर, कटावन्या, कोयते जप्त केले आहेत. पण या टोळीतील एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला

संबंधित बातम्या :

दुकानासमोर भिकारी बनून रेकी, नंतर दरोडा, देशभरात धुमाकूळ माजवणारी टोळी नालासोपाऱ्यात जेरबंद

लॉकअप तोडून कुख्यात दरोडेखोर पळाला, पोलिसांना चकवा देत महाराष्ट्रभर हिंडला, अखेर मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या

(Thane Badlapur Royal Enfield Bike Showroom Robbery)

Follow Us
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप