‘सीमा हैदर को पाक नहीं भेजा तो…’, मुंबई पोलिसांना धमकी

सध्या देशभरात सीमा हैदर प्रकरण चांगलेच गाजत आहे. पाकिस्तानातून ही महिला भारतात आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी आली आहे. तिला परत पाकिस्तानात पाठवण्यासाठी धमकी देण्यात आली आहे.

'सीमा हैदर को पाक नहीं भेजा तो...', मुंबई पोलिसांना धमकी
सीमा हैदरकडे सापडले दोन पासपोर्ट
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 8:11 AM

मुंबई : सध्या देशभरात गाजत असलेल्या सीमा हैदर प्रकरणात मुंबई पोलिसांना धमकी मिळाली आहे. सीमा हैदर प्रकरणावरुन थेट मुंबई पोलिसांनाच धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली. ‘सीमा हैदरला पाकिस्तानात पुन्हा पाठवले नाही तर 26/11 सारख्या हल्ल्यासाठी तयार रहा’, अशी धमकी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला आली आहे. तसेच याला उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असल्याचे फोन करणाऱ्याने म्हटले आहे. मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखा या फोनबाबत सखोल चौकशी करत आहेत. याआधीही मुंबई पोलीस कंट्रोल रुमला असे कॉल आले होते.

काय म्हटलंय धमकीमध्ये?

मुंबई पोलिसांना धमकी देणारा उर्दू भाषेत बोलत होता. जर सीमाला पाकिस्तानात परत पाठवले नाही तर भारताचा नाश होईल. 26/11 प्रमाणे हल्ल्यासाठी तयार रहा, अशी धमकी देण्यात आली आहे. 12 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला हा कॉल आला होता.

13 जुलै रोजी नोएडात आली सीमा

सीमा हैदर 13 जुलै रोजी पाकिस्तानातून नोएडात आपल्या प्रियकराकडे दाखल झाली. यानंतर दोघंही नोएडात भाड्याच्या घरात राहू लागले. पाकिस्तानातून महिला भारतात आल्याची माहिती उघड होताच पोलिसांनी 4 जुलै रोजी दोघांना अटक केली. मात्र त्यानंतर जामीनावर दोघांची सुटका करण्यात आली. याआधी 10 मार्च रोजी ती नेपाळला आली होती. दोघांनी नेपाळमध्ये मंदिरात लग्न केल्याचा दावा केला आहे. यानंतर ती पाकिस्तानला परत गेली.

हे सुद्धा वाचा

मात्र तिला सचिन सोबत रहायचे होते, म्हणून ती 10 मे रोजी पुन्हा पाकिस्तानातून निघाली. मग शारजाह, काठमांडू,पोखरा, दिल्ली असा प्रवास करत 13 जुलै रोजी नोएडात पोहचली. नोएडात सचिन तिची वाट पाहत होता.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.