AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीपासून विभक्त मुलगी गरोदर, आईचा संताप, 30 वर्षीय लेकीची सुपारी देऊन हत्या

आईने सुपारी देऊन मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. विरुर पोलिसांनी या हत्याकांडाचा खुलासा केला आहे. पतीपासून विभक्त राहणारी संबंधित महिला गर्भवती राहिल्याने तिच्या चारित्र्याबाबत आईच्या मनात शंका उपस्थित झाली होती.

पतीपासून विभक्त मुलगी गरोदर, आईचा संताप, 30 वर्षीय लेकीची सुपारी देऊन हत्या
Image Credit source: tv9
| Edited By: Anish Bendre | Updated on: Feb 23, 2022 | 6:32 AM
Share

चंद्रपूर : जन्मदात्यांनीच आपल्या पोटच्या मुलांना संपवल्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आईने सुपारी देऊन मुलीचा खून (Mother killed Daughter) केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील विरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत (Chandrapur Crime) ही घटना घटना घडली आहे. 30 वर्षीय तरुणी तेलंगणाच्या विजयवाडा जिल्ह्यातील कोंडापल्ली येथील रहिवासी होती. पतीपासून विभक्त झालेली मुलगी गर्भवती झाल्याने आईचा संताप झाला. त्यामुळे तिने लेकीच्या हत्येचा रचला कट (Murder) रचल्याचा आरोप आहे. 30 हजार रुपयांच्या मोबदल्यात नातेवाईकांनीच तिची सुपारी घेतल्याचा दावा केला जात आहे. आरोपी महिलेच्या नातात्यातील दाम्पत्याने पीडितेला विहिरीत ढकलून तिचा खून केला. पोलिसांनी या हत्ये प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

आईने सुपारी देऊन मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. विरुर पोलिसांनी या हत्याकांडाचा खुलासा केला आहे. 18 फेब्रुवारीला एका अज्ञात महिलेचा मृतदेह राजुरा तालुक्यातील कविटपेठ येथे विहिरीत आढळला होता. महिलेची ओळख पटविण्यासाठी विरुर पोलिसांनी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्येही तिचे फोटो पाठवले होते. त्यावरुन मयत महिला तेलंगणाच्या विजयवाडा जिल्ह्यातील कोंडापल्ली येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली.

मुलीच्या चारित्र्याबाबत आईला शंका

पतीपासून विभक्त राहणारी संबंधित महिला गर्भवती राहिल्याने तिच्या चारित्र्याबाबत आईच्या मनात शंका उपस्थित झाली होती. त्यामुळे गर्भपात करण्याच्या बहाण्याने तिच्या आईने मुलीला राजुरा तालुक्यातील मुंडीगेट येथील नातेवाईकाकडे पाठवले.

तीस हजारांची नातेवाईकांना सुपारी

तीस हजारांसाठी मुंडीगेट येथील नातेवाईक सीन्नू आणि त्याची पत्नी शारदा यांनी विहिरीत ढकलून महिलेचा खून केला. मात्र पोलिसांनी आरोपींचे कॉल डिटेल्स आणि जबाबतील विसंगती यांच्या आधारे खुनाचा उलगडा केला. महिलेची आई लचमी, नातेवाईक सीन्नू आणि शारदा यांना अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

माय तू वैरीण निघालीस.. प्रियकराच्या मदतीनं आईनंच केला मुलाचा खून, औरंगाबादमधील वैजापूरची घटना

दोघे भाऊ बहिणीच्या घरी भांड-भांड-भांडले, वादात मध्यस्थी करणाऱ्या भावोजींची हत्या

कॉन्स्टेबल नवऱ्याची कॉन्स्टेबल बायको, नायब तहसीलदारावर जीव जडला, नाल्यात मृतदेह आढळला

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...