वडधामन्यात युवतीची आत्महत्या, घरीच ओढणीने घेतला गळफास

वडधामना येथे एक 17 वर्षीय युवतीनं ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोमल बावनकर असं युवतीचं नाव आहे. ही घटना 12 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.

वडधामन्यात युवतीची आत्महत्या, घरीच ओढणीने घेतला गळफास
suicide
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 4:03 PM

नागपूर : वडधामना येथे एक 17 वर्षीय युवतीनं ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोमल बावनकर असं युवतीचं नाव आहे. ही घटना 12 नोव्हेंबर रोजी दुपारी घडली.

सुसाईट नोट सापडली नाही

कोमलचे वडील तिच्या आईपासून वेगळे राहतात. तिची आई मिराबाई कामानिमित्त बाहेर गेली होती. कोमल घरी एकटीच टीव्ही पाहत होती. दरम्यान, दुपारी तिची मैत्रीण पुस्तक मागण्यासाठी तिच्याकडे आली असता कोमलनं लाकडी बल्लीला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला होता. मैत्रिणीने कोमलच्या आईला बोलावले. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांना कोणत्याही प्रकारची सुसाईट नोट सापडली नाही. त्यामुळं तिने आत्महत्या का केली, हे अद्याप कळू शकले नसल्याची माहिती वाडीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दुर्गोधन गवई यांनी दिली.

दिव्याने लागलेल्या आगीत चिमुकलीचा मृत्यू

बेसा रोडवरील शाहूनगरात राहणाऱ्या पाच वर्षीय मुलीचा दिव्याने लागलेल्या आगीत मृत्यू झाला. भूमिका शिर्के असं मृतक चिमुकलीचे नाव आहे. भूमिका ही 2 नोव्हेंबरला अंगणात खेळत होती. खेळत असताना दिव्याची आग तिच्या ओढणीला लागली. त्यात ती गंभीर भाजली गेली. तिला लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते. 10 नोव्हेंबरला डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. राजू यादव यांच्या तक्रारीवरून, हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

बेलतरोडीत दोन लाखांचा ऐवज लंपास

बेलतरोडीतील प्रभूनगरात श्रीश खांडेकर यांच्या घरून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. नवनाथ सोसायटीत राहणारे श्रीश (वय 38) हे मामाकडे साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी कुटुंबीयांसह रामकृष्णनगरात गेले होते. 12 नोव्हेंबरला दुपारी घरी आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. नगदी 14 हजार रुपये आणि सोने-चांदी असा एकूण एक लाख 92 हजार 600 रुपयांचा ऐवज त्यांच्या घरच्या कपाटातून लंपास झाला होता. बेलतरोडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

अमरावती दुसऱ्या दिवशीही पेटले, संपूर्ण जिल्ह्यात चार दिवसांची संचार बंदी, इंटरनेट सेवाही बंद

मेडिकलच्या डॉक्टरांचे आजपासून कामबंद, रुग्णसेवेवर होणार परिणाम?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.