सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, जमिनीतील पिकाच्या वादातून भावा-भावांमधील वाद टोकाला

| Updated on: Nov 01, 2022 | 2:21 PM

गेल्या काही दिवसांपासून निफाड तालुक्यातील करंजगाव येथील रमेश अर्जुन भगुरे आणि शिवाजी अर्जुन भगुरे या भावांमध्ये शेत जमीन आणि सोयाबीन पिकावरून वाद सुरू होता.

सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, जमिनीतील पिकाच्या वादातून भावा-भावांमधील वाद टोकाला
संपत्तीसाठी पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी
Image Credit source: Google
Follow us on

निफाड : जमीन आणि पिकाच्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये झालेल्या मारहाणीत एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची घटना निफाड तालुक्यातील करंजगाव येथे घटना घडली आहे. यावेळी महिलांनाही मारहाण केल्याचा संतापजनक व्हिडिओ समोर आल्याने या घटनेमुळे संपूर्ण निफाड तालुका हादरला आहे. रमेश अर्जुन भगुरे आणि शिवाजी अर्जुन भगुरे अशी हाणामारी करणाऱ्या दोघा भावांची नावे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून दोन भावांमध्ये सुरु होता वाद

गेल्या काही दिवसांपासून निफाड तालुक्यातील करंजगाव येथील रमेश अर्जुन भगुरे आणि शिवाजी अर्जुन भगुरे या भावांमध्ये शेत जमीन आणि सोयाबीन पिकावरून वाद सुरू होता. आज सकाळी सोयाबीन सोंगणी करण्यासाठी शेतामध्ये आलेल्या मजुरांना मोठा भाऊ रमेशने दमदाटी केल्याने मजूर निघून गेले.

यावेळी वडील अर्जुन भगुरे हे समजावण्यासाठी गेले असता रमेशने वडिलांना शिवीगाळ दमदाटी केली. यामुळे छोटा भाऊ शिवाजी हा समजूत काढण्यासाठी गेला. मात्र समजूत काढण्यासाठी गेलेल्या सख्खा भाऊ शिवाजी, त्याची बायको आणि मुलीला रमेशने दोन मुलांच्या मदतीने बेदम मारहाण केली.

हे सुद्धा वाचा

जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर

या मारहाणीत जखमी झालेल्या एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या मारहाणीत महिलांना साडी ओढून मारहाण करत असल्याचा संतापजनक व्हिडिओ समोर आल्याने संपूर्ण निफाड तालुका हादरला आहे.

सायखेडा पोलिसात गुन्हा दाखल

याप्रकरणी सायखेडा पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा या मारहाणीतील जखमींचा आरोप केला आहे. मात्र मारहाणीनंतर सायखेडा पोलीस ठाण्यात निलेश रमेश भगुरे, प्रसाद रमेश भगुरे आणि रमेश अर्जुन भगुरे या तिघांविरोधात कलम 354, 324, 323, 504, 506, 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी जी कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर पी घुगे तपास करत आहेत.