AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाडीला ठोकताच थेट कारच्या छतावर उडाला तरुण, व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल

सुदैवाने यात तरुण सुखरुप बचावला आहे. मात्र वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर काय होते याची प्रचिती व्हिडिओ पाहून आपणालाही नक्की येईल.

गाडीला ठोकताच थेट कारच्या छतावर उडाला तरुण, व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल
गाडीला ठोकताच थेट कारच्या छतावर उडाला तरुणImage Credit source: social
| Updated on: Oct 31, 2022 | 7:41 PM
Share

सोशल मीडियावर अपघातांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ अक्षरशः अंगाचा थरकाप उडवणारे असतात. यातील बऱ्याच घटना वाहतुकीचे नियम न पाळल्याने घडतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. एक दुचाकीस्वार पुढे उभ्या असलेल्या कारवर आदळला. आश्चर्याची बाब म्हणजे यात दुचाकीस्वाराला जराही खरचटले नाही. मात्र कारवर धडकल्यानंतर तो थेट गाडीच्या छतावर उडाला.

सुदैवाने यात तरुण सुखरुप बचावला आहे. मात्र वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर काय होते याची प्रचिती व्हिडिओ पाहून आपणालाही नक्की येईल.

काय आहे व्हिडिओत?

व्हिडिओत एक तरुण वेगात बाईक चालवत आहे. बाईकचा वेग इतका होता की समोर असलेल्या पांढऱ्या रंगाच्या गाडीला जोरदार धक्का दिला. कारवर आदळल्यानंतर बाईकस्वार थेट हवेत उडून कारच्या छतावर पडला.

व्हिडिओत आपण पाहू शकता की, पांढऱ्या रंगाची कार काळ्या रंगाच्या कारमागे हळूहळू सरकत आहे. एवढ्यात मागून वेगात आलेल्या बाईकची पांढऱ्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती, की कारला धडक दिल्यानंतर कारही थोडी पुढे ढकलली गेली.

केवळ निष्काळजीपणामुळे तरुणासोबत ही घटना घडली आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून तरुण यातून सुखरुप बचावला आहे. एखाद्या चित्रपटात शोभेल असे हे दृश्य पाहून तुम्हीही चकीत व्हाल.

सोशल मीडियावर व्हिडिओला लाईक्स

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ खूप लोकांकडून पाहिला आणि शेअर केला जात आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 496.1K व्ह्यूज मिळाले आहेत, तर 10 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स विविध प्रतिक्रियाही देत आहेत.

विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.