AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली वहिनी, मग पतीचा काटा काढत मृतदेह लपवला; पण…

रामसुशील पाल असे 40 वर्षीय मयत पतीचे नाव आहे. रीवा जिल्ह्यातील उमरी गावात रामसुशील आपल्या कुटुंबासह राहत होता. रामसुशीलच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्याने त्याने रंजना हिच्याशी दुसरा विवाह केला होता.

दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली वहिनी, मग पतीचा काटा काढत मृतदेह लपवला; पण...
दीड वर्षानंतर हत्येचे रहस्य उलगडलेImage Credit source: social
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Oct 31, 2022 | 4:42 PM
Share

रीवा : दिराच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या महिलेने दीर आणि चुलत सासऱ्याच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने महिलेने पतीचा काटा काढला आणि तब्बल दीड वर्षे मृतदेह लपवून ठेवला. त्यानंतर मृतदेह जंगलात फेकून दिला. जंगलात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि अखेर महिलेची पोलखोल झाली. याप्रकरणी पोलिसांनी महिलेसह चौघांना अटक केली आहे. तर दोन आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

रामसुशील पाल असे 40 वर्षीय मयत पतीचे नाव आहे. रीवा जिल्ह्यातील उमरी गावात रामसुशील आपल्या कुटुंबासह राहत होता. रामसुशीलच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्याने त्याने रंजना हिच्याशी दुसरा विवाह केला होता.

पत्नीचे दिराशी प्रेमसंबंध जुळले

विवाहाच्या दोन वर्षांनंतर रंजनाचे दिर गुलाबसोबत प्रेमसंबंध जुळले. रामसुशीलला याबाबत कळल्यानंतर दररोज पती-पत्नीमध्ये भांडण होत असे. यामुळे रंजना आणि गुलाबने रामसुशीलचा काटा काढण्याचे ठरवले. रामसुशीलच्या मृत्यूनंतर त्याची संपत्तीही आपल्याला मिळेल असे दोघांना वाटले.

पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे दोघांमध्ये रोज भांडण व्हायचे

रंजना आणि गुलाबने या कटात रामसुशीलचा चुलत भाऊ अंजनी, काका रामपती यांच्यासह अन्य दोघांना सामील करुन घेतले. प्लाननुसार आधी रामसुशीलला समोशामध्ये उंदिर मारण्याचे औषध मिसळून खाऊ घातले. यामुळे रामसुशीलचा मृत्यू झाला. त्यानंतर गुलाब आणि अंजनीने मृतदेहाचे दोन तुकडे करुन गोणीत भरले आणि दीड वर्ष भुशामध्ये लपवले.

भुसा संपत आल्याने मृतदेह जंगलात फेकला

भुसा संपत आल्याने मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न आरोपींसमोर उभा रहिला. यामुळे मृतदेह संपूर्ण सडल्याने आरोपींनी भाटी येथील जंगलात फेकून दिला. यानंतर रंजना उमरी गाव सोडून मिर्झापूरला निघून गेली.

रीवा पोलिसांना जंगलात पुरुषाचा सांगाडा मिळाल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सांगाडा ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर गांधी मेमोरियल रुग्णालयात सांगाड्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली.

चौकशी दरम्यान पोलिसांना रामसुशीलबाबत माहिती मिळाली

हत्येचा तपास करत हा सांगाडा कुणाचा आहे हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी आसपासच्या परिसरात चौकशी सुरु केली. चौकशी दरम्यान पोलिसांना दीड वर्षापूर्वी गायब झालेल्या रामसुशीलबाबत माहिती मिळाली.

रामसुशील दीड वर्षापासून दिसला नाही आणि त्याची पत्नीही गाव सोडून गेल्याचे गावातील लोकांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तात्काळ मिर्झापूरला दाखल होत रंजनाला ताब्यात घेतले. रंजनाला पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबुल केला.

पोलिसांनी पत्नीसह चौघांना अटक केली

यानंतर पोलिसांनी रंजनासह गुलाब, अंजनी, रामपती यांना अटक केली. तर अन्य दोन आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचाही कसून शोध घेत आहेत. सर्व आरोपींवर कलम 302, 201 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर