AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटी ठरलं? येत्या 10 तारखेला…राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सर्वात मोठी अपडेट; बड्या नेत्याने सगळं सांगितलं

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाविषयी वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. असे असतानाच आता तटकरे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या विधानामुळे विलीनीकरणाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

शेवटी ठरलं? येत्या 10 तारखेला...राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सर्वात मोठी अपडेट; बड्या नेत्याने सगळं सांगितलं
sunetra pawar and sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 07, 2026 | 5:44 PM
Share

Sunil Tatkare NCP Merger : राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चेनेही जोर धरला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेल्या काही नेत्यांनी आम्ही विलीनीकरणास अनुकूल नसल्याचेच अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते मात्र अजितदादांना विलीनीकरण हवे होते, असे ठामपणे सांगत आहेत. त्यामुळेच आता भविष्यात नेमके काय-काय होणार? असा प्रश्न सामान्यजनांकडून उपस्थित केला जात आहे. असे असतानाच आता अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे यांनी केलेल्या एका विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी केलेल्या या विधानामुळे आता भविष्यात दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार का? असे नव्याने विचारले जात आहे.

तटकरे नेमकं काय म्हणाले?

पत्रकारांनी सुनील तटकरे यांना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत विचारले. या प्रश्नाचे उत्तर देताना तटकरे यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत. आम्ही सर्वांनी मिळून अजितदादा यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. शेवटी विलीनीकरणाची चर्चा आम्ही सखोलपणे करू. येत्या 10 फेब्रुवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बैठकीला उपस्थित असतील. त्यावेळी आम्ही सुनेत्रा पवार यांच्यासोबत विलीनीकरणाबाबत नक्कीच चर्चा करू, असे तटकरे म्हणाले. यासह सुनेत्रा पवार दिल्लीमध्येही येऊ शकतील. राष्ट्रपती महोदयांची भेट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्या भेट घेऊ शकतात. आम्ही योग्य वेळेला बसून विलीनीकरणाबाबत चर्चा करू, असेही ते म्हणाले आहेत.

विमान अपघातावर तटकरे काय म्हणाले?

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावर बोलताना मी अगोदरपासूनच अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकार, केंद्र सरकारला केली आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे. अजितदादांचं जाणं धक्कादायक होतं. त्यामुळे या अपघातामागील सत्य बाहेर येणं महत्त्वाचं आहे, अशा भावना तटकरे यांनी व्यक्त केल्या. जे लोक अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित करत आहेत, त्यांच्याशीदेखील तपास यंत्रणांनी संपर्क साधावा, अशी मागणी तटकरे यांनी केली. तसेच अजितदादा यांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित करणारे हे मोठ्या पदावर बसलेले नेते आहेत. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडेही विनंती करतो की त्यांनी या नेत्यांकडे असलेली माहिती घ्यावी. कारण राज्यातील जनतेला दुर्दैवी विमान अपघातामागील सत्य लवकरात लवकर समजलेच पाहिजे, अशी भूमिका तटकरे यांनी मांडली.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?