AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्दी खोकला व चेहऱ्यावरील निस्तेजपणा ही दूर, वापरून पाहा जायफळ

जायफळमध्ये असे अनेक गुणधर्म आहे जे तुमच्या आरोग्यावर आणि त्वचेवर आश्चर्यकारक परिणाम करते. तसेच विविध समस्यांवर मात करण्यासही जायफळ खूप उपयुक्त आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण जायफळाचे 5 उपयुक्त उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

सर्दी खोकला व चेहऱ्यावरील निस्तेजपणा ही दूर, वापरून पाहा जायफळ
| Edited By: | Updated on: Feb 07, 2026 | 5:30 PM
Share

जायफळाचा वापर मसालेदार पदार्थांपासून ते मिष्टान्नांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये केला जातो. किंचित तिखट आणि खमंग चव असलेले जायफळ हे मायरिस्टिका फ्रॅग्रॅन्स झाडाच्या फळापासून मिळते. जायफळमध्ये एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करणारे उपयुक्त संयुगे असतात. मात्र बहुतेक लोकं जायफळाचा वापर आरोग्याच्या फायद्यांपेक्षा त्याच्या चवीसाठी जास्त करतात. एवढेच नाहीतर जायफळ हे त्वचेचे आरोग्य सुधारण्यापासून ते तोंडाची दुर्गंधी दूर करण्यापर्यंत आणि जळजळ आणि वेदना कमी करण्यापर्यंत अनेक प्रकारे फायदेशीर आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी कोणते पाच उपाय आहेत ते जाणून घेऊयात.

हेल्थलाइनच्या मते, जायफळ तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकते. मूड सुधारणेपासून ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यापर्यंत उपयुक्त आहे. म्हणून जायफळ तुमच्या आहारात मर्यादित प्रमाणात समाविष्ट केले पाहिजे.

सर्दी आणि खोकला कमी करण्यासाठी फायदेशीर

जायफळ हे सर्दी आणि खोकल्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. प्राचीन काळापासून जायफळाचा हे हंगामी आजार बरं करण्यासाठी वापर करत आहेत. तसेच लहान मुलांनाही कमी प्रमाणात जायफळ उगाळून देता येते. जायफळाची पावडर दुधात मिक्स करून मुलाला द्या. यामुळे सर्दी, खोकला होत नाही.

त्वचेसाठी जायफळ उपयुक्त

जायफळाचा त्वचेवरही आश्चर्यकारक परिणाम होतो. चेहऱ्यावरील काळे डाग तसेच सुरकूत्या असतील तर जायफळ पावडर कच्च्या दुधात किंवा गुलाबपाण्यात मिक्स करून लावा. किंवा जायफळ पावडरची पेस्ट बनवा. आठवड्यातून हे तीन वेळा लावल्याने काही दिवसांतच सकारात्मक परिणाम त्वचेवर दिसून येईल. तसेच जायफळ पेस्ट लावल्याने पिंपल्सपासून मुक्तता मिळते. जायफळ फक्त 10 ते 12 मिनिटे चेहऱ्यावर लावावे.

तणावापासून मिळेल मुक्तता

रात्री दोन चिमूट जायफळ पावडर कोमट दुधात मिक्स करून प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप येते आणि ताण कमी होतो. काही संशोधनातून असे दिसून आले आहे की जायफळाचे गुणधर्म तुमचा मूड सुधारू शकतात. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म वेदना आणि कडकपणा कमी करतात, ज्यामुळे तुम्हाला आराम मिळतो.

सांधेदुखी कमी करण्यासाठी जायफळ सर्वोत्तम

जायफळाचे सेवन करणे फायदेशीर आहे, तसेच त्याचे तेल देखील फायदेशीर आहे. जर तुम्हाला सांधे किंवा स्नायूंमध्ये वेदना आणि सूज येत असेल तर तुम्ही जायफळ तेल लावू शकता. संधिवात असलेल्यांसाठी जायफळाचे तेल फायदेशीर ठरू शकते. तुम्ही जायफळ पावडर आणि तिळाच्या तेलाचे मिश्रण करून बनवलेली पेस्ट देखील लावू शकता.

तोंडाची दुर्गंधी निघून जाईल

तोंडातून दुर्गंधी येत असेल किंवा हिरड्या दुखत असतील तर तुम्ही जायफळ वापरू शकता, कारण त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत. तुम्ही जायफळ पावडर किंवा अर्कपासून बनवलेले माउथवॉश वापरू शकता. पर्यायी म्हणून तुम्ही जायफळाचे छोटे तुकडे चोखू शकता. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास देखील मदत होईल. जायफळापासून बनवलेले तेल हिरड्यांचे दुखणे कमी करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.