AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2026 अंतिम सामन्यापूर्वी रजत पाटीदारने मन केलं मोकळं, टीम इंडियाच्या सिलेक्शनबाबत सांगितलं की..

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. जेतेपदाच्या शर्यतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आहे. असं असताना आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याने स्पर्धेपूर्वी आपलं म्हणणं मांडलं. इतकंच काय तरी टीम इंडियातील निवडीबाबतही मनातलं सांगितलं.

आयपीएल 2026 अंतिम सामन्यापूर्वी रजत पाटीदारने मन केलं मोकळं, टीम इंडियाच्या सिलेक्शनबाबत सांगितलं की..
आयपीएल 2026 अंतिम सामन्यापूर्वी रजत पाटीदारने मन केलं मोकळं, टीम इंडियाच्या सिलेक्शनबाबत सांगितलं की..Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 30, 2026 | 8:37 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ जेतेपदापासून एक विजय दूर आहे. अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वात सलग दुसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याचं स्वप्न आहे. मागच्या पर्वात आरसीबीने 18 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदा जेतेपद पटकावलं होतं. आता सलग दुसऱ्यांदा ही संधी चालून आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधये हा सामना होणार असून या सामन्यापूर्वी रजत पाटीदार याने मीडियाशी संवाद साधला. त्याने आरसीबीचा अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासाबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं. इतकंच काय तर यात एक प्रश्न टीम इंडियाच्या सिलेक्शनबाबत होता. त्याचंही स्पष्टीकरण निसंकोचपणे रजत पाटीदार याने दिलं.

अंतिम सामन्याबाबत काय म्हणाला रजत पाटीदार?

आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदाच्या सामन्यापूर्वी कर्णधार रजत पाटीदारने आरसीबी संघाबाबत सांगितलं. रजत पाटीदार म्हणाला की, “प्रत्येक खेळाडू जबाबदारी घेत आहे, मग तो फलंदाजीला जात असो वा गोलंदाजीला. जबाबदारी हाच मुख्य शब्द आहे ज्याचा प्रत्येकजण विचार करत आहे. प्रत्येकजण संघासाठी योगदान देण्यास उत्सुक आहे. आम्ही फायनल खेळण्यासाठी आणि जिंकण्यासाठी येथे आहोत.”

टीम इंडियाच्या सिलेक्शनबाबत काय म्हणाला?

रजत पाटीदारला पत्रकार परिषदेत टीम इंडियाच्या निवडीबाबतही प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने सांगितलं की, “मी सध्या भारतीय संघातील निवडीबद्दल विचार करत नाहीये. सध्या माझ्या मनात तो विचार नाही.” रजत पाटीदारने भारतीय संघात कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते, पण ते दोन वर्षांपासून संघाबाहेर आहे.

रजत पाटीदारने डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्याला 16 चेंडूंमध्ये फक्त 22 धावा करता आल्या. त्यानंतर, 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाटीदार तीन कसोटी सामने खेळला. पण तिन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला आणि सहा डावांमध्ये फक्त 63 धावा केल्या. तेव्हापासून त्याचा संघातून पत्ता कापला गेला आहे. मात्र आता संधी मिळेल का? हा प्रश्न आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...