FIFA World Cup 2026 : फिफा वर्ल्ड कपदरम्यान पुरुष खेळाडू काळ्या रंगाची ब्रा का घालत होते? ऐकून धक्का बसले
जर तुम्ही या वर्ल्ड कपमधील सामने पाहिले असतील तर तुम्ही एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असणार, अनेक खेळाडू आपल्या जर्सीच्या खाली काळ्या रंगाचा स्पोर्ट ब्रा घालत होते, पण असा का असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?

न्यूज जर्सी स्टेडियममध्ये 20 जुलै रोजी फिफा वर्ल्ड कप 2026 (FIFA World Cup 2026) चा समारोप सोहळा होणार आहे. जर तुम्ही या वर्ल्ड कपमधील सामने पाहिले असतील तर तुम्ही एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असणार, या स्पर्धेत सहभागी झालेले पुरुष खेळाडू आपल्या जर्सीखाली काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा सारखं दिसणारं काहीतरी घालत होते. तुम्हाला माहिती आहे का की हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे? काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा सारखी दिसणारी ही वस्तू म्हणजे एक जीपीएस परफॉर्मन्स ट्रॅकिंग बनियान आहे, ज्याला तांत्रिक भाषेमध्ये स्मार्ट वेस्ट असं देखील म्हटलं जातं. या डिव्हाइसमुळे संघ व्यवस्थापनाला रिअर टाइम्समध्ये खेळाडूंची तंदुरुस्ती आणि कामगिरीवर लक्ष ठेवण्यास मदत होते.
स्मार्ट वेस्ट कसं काम करतं?
जेव्हा मॅच सुरू असते, तेव्हा खेळाडू या स्मार्ट वेस्टला आपल्या जर्सीच्या आतून घालतात, हे स्मार्ट वेस्ट खेळाडूंच्या बॉडिला चिटकून बसते. खेळाडूच्या खांद्याच्या थोडं खाली या स्मार्ट वेस्टला एक छोटासा खिसा असतो, ज्यामध्ये एक कंपॅक्ट जीपीएस ट्रॅकिंग डिव्हायस ठेवलेलं असतं, सामान्यपणे या डिव्हायसचा आकार एका माचिसच्या आकाराचा असतो. जेव्हा एखादा खेळाडू मैदानात स्पर्धेत खेळत असतो किंवा सराव करत असतो, त्या काळात हे डिव्हायस सातत्याने सॅटेलाईटच्या मदतीने खेळाडूच्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असते. त्यामुळे खेळाडूंची तंदुरुस्ती आणि कामगिरीवर रिअल-टाइममध्ये लक्ष ठेवण्यास मदत होते. खेळाडूंना स्पर्धेदरम्यान कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी याची रचना ही ब्रा सारखी करण्यात आली आहे.
दुखापतीपासून संरक्षण
या ट्रॅकरच्या मदतीने खेळाडूच्या प्रत्येक हालचालींकडे बारीक लक्ष ठेवता येत असल्यामुळे अनेक फायदे होतात, जर एखादा खेळाडू अति सराव करत असेल तर ते देखील कोचिंग स्टाफच्या लगेच लक्षात येते. अनेकदा खेळाडू प्रचंड थकून जातात, ते देखील यामध्ये नोट केलं जातं. त्यामुळे खेळाडूमध्ये ट्रेनिंग आणि स्पर्धा काळात होणारे सर्व बदल या ट्रॅकरच्या मदतीने अचूक टिपले जात असल्यामुळे खेळांडूचे सर्व प्रकारच्या दुखापतीपासून संरक्षण होतं.
