AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट SSC आणि HSSC समकक्ष मान्यता, या राज्याने घेतला निर्णय..

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. गोवा राज्याने आयटीआय अभ्यासक्रमाला थेट SSC आणि HSSC समकक्ष मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.

आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट SSC आणि HSSC समकक्ष मान्यता, या राज्याने घेतला निर्णय..
Goa CM Dr. Pramod Sawant took a historic decision today.
| Updated on: Jul 17, 2026 | 7:43 PM
Share

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (आयटीआय) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( SSC ) आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( HSSC ) समकक्ष मान्यता देण्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अशा प्रकारची व्यवस्था लागू करणारे गोवा हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य ठरले आहे. या उपक्रमामुळे पात्र विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण, सरकारी भरती, स्पर्धा परीक्षा आणि अधिक चांगल्या करिअरच्या संधींचे नवे दरवाजे खुले होणार आहेत.

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कला अकादमी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी गोवा राज्यातील आयटीआय क्षेत्राच्या सर्वांगीण परिवर्तनासाठी १८० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचीही घोषणा केली आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, अत्याधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण आणि भविष्यातील उद्योगांच्या गरजांनुसार प्रशिक्षण व्यवस्था उभारून गोव्यातील आयटीआय जागतिक दर्जाच्या संस्थांमध्ये विकसित करण्याचा सरकारचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

कौशल्य विकासाला मुख्य प्रवाहातील शिक्षणा इतकेच महत्त्व मिळणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने पात्र आयटीआय विद्यार्थ्यांना थेट SSC आणि HSSC समकक्ष मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, पदविका, पदवी अभ्यासक्रम, सरकारी नोकऱ्या तसेच शालेय पात्रतेची अट असलेल्या विविध रोजगार संधींसाठी पात्रता मिळणार आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

या उपक्रमाला औपचारिक स्वरूप देण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय ( DSDE ) आणि गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ( GBSHSE ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. तसेच Notification No. GBSHSE/Acad/ITI/2025/1969 दिनांक २२ सप्टेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ मधील सुधारित अधिसूचनेद्वारे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत NASSCOM, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय, मापुसा आणि काकोडा येथील सरकारी आयटीआय, एस. एस. डेम्पो महाविद्यालय आणि नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन संचालनालय यांच्यासह पाच महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, ऑन-द-जॉब प्रशिक्षण, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी आयटीआय,विविध सरकारी विभाग, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप्स आणि युवा उद्योजकांनी सादर केलेल्या नवोपक्रम प्रदर्शनाला भेट दिली. इंडिया स्किल्स स्पर्धेतील विजेते, राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी आणि कौशल्य विकास क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रशिक्षकांचाही त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

गोवा हे देशातील १०० टक्के ISO प्रमाणित सरकारी आयटीआय असलेले एकमेव राज्य असल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, मुलींसाठी शुल्कमुक्त आयटीआय शिक्षण, आधुनिक प्रशिक्षण सुविधा, उद्योगांशी मजबूत भागीदारी आणि Skilling, Reskilling, Upskilling या धोरणांमुळे गोवा देशातील कौशल्य विकासाचे अग्रगण्य मॉडेल म्हणून उदयास येत आहे.

विकसित भारताच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, १८० रुपये कोटींची ही गुंतवणूक केवळ आयटीआयच्या आधुनिकीकरणापुरती मर्यादित नसून ती गोव्याच्या युवकांच्या भविष्यातील गुंतवणूक आहे. कौशल्याधारित शिक्षणाला समान शैक्षणिक मान्यता देत उद्योग, शिक्षण आणि रोजगार यांना जोडणारी ही सुधारणा विकसित गोवा आणि विकसित भारताच्या दिशेने उचललेले ऐतिहासिक पाऊल असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ