AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांनंतर आर अश्विनने टीम इंडियाबाबत उपस्थित केले प्रश्न, बीसीसीआयला सुनावलं

रोहित शर्माच्या वनडे क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवटचा सामना लॉर्ड्सवर खेळला जाणार या बातम्यांना ऊत आल आहे. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. दुसरीकडे, या चर्चा सुरू असताना आर अश्विनने बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. यावेळी एक बोचणारी बाब सांगितली.

रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांनंतर आर अश्विनने टीम इंडियाबाबत उपस्थित केले प्रश्न, बीसीसीआयला सुनावलं
रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांनंतर आर अश्विनने टीम इंडियाबाबत उपस्थित केले प्रश्न, बीसीसीआयला सुनावलंImage Credit source: Getty Images
| Updated on: Jul 17, 2026 | 8:01 PM
Share

इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका सुरू असताना रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांचा धुराळा उडाला आहे. खरंच निवृत्ती घेणार का? तसेच त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीचा शेवटचा सामना असणार का? या प्रश्नांचा क्रीडाप्रेमींनी भडिमार केला आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आर अश्विन यानेही टीम इंडिया आणि बीसीसीआयच्या विचार आणि परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आर अश्विनच्या मते, खेळाडूंसोबत चर्चा करून त्याने बाहेर काढलं पाहीजे. अश्विनच्या या प्रश्नामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खेळाडूंसोबत थेट बोललं जात नाही, असा अर्थ यातून निघतो. अश्विनने बीसीसीआय आणि टीम इंडियावर टीका करत सांगितलं की, खेळाडूंच्या कारकि‍र्दीचा शेवट अजून चांगल्या प्रकारे होऊ शकतो.

आर अश्विन काय म्हणाला?

रोहित शर्माच्या निवृत्तीच्या वावड्या उठल्या असताना आर अश्विनने याबाबत आपलं म्हणणं मांडलं आहे. आर अश्विन म्हणाला की, ‘बघा, संघातून कोणीही ड्रॉप होऊ शकतं. ते निवडकर्ते, कर्णधार आणि प्रशिक्षकाचं काम आहे. संघातून वगळल्यानंतर खेळाडू विचारू शकतो की, मी काय केलं तर संघात माझी पुन्हा एन्ट्री होईल. जर काहीच काम नसेल तर सोडायला हवं, वय झालं असेल तर सोडावं लागेल.’

आर अश्विन पुढे म्हणाला की, ‘माझा मुद्दा हा आहे की खेळाडूशी थेट संवाद व्हायला हवा. हे चांगल्या प्रकारे केले जाऊ शकते. तुम्ही मोठ्या कंपन्यांकडे पाहिल्यास, त्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतात. पण जर वरिष्ठ स्तरावर कोणी असेल ज्याने कंपनीसाठी खूप योगदान दिले आहे, तर त्यांच्याशी चांगल्या प्रकारे बोलले पाहिजे.”

आर अश्विन पुढे सांगितलं की, “जर कोणी तुमच्यासाठी दोन दशके चांगली कामगिरी केली असेल, इतके सामने जिंकले असतील, तर त्यांच्याशी चांगल्या प्रकारे बोलले पाहिजे. त्यांना चांगल्या प्रकारे मार्ग दाखवला पाहिजे. अगदी त्यांना संघातून वगळण्याचा निर्णयसुद्धा अधिक चांगल्या प्रकारे घेतला जाऊ शकतो.’

आर अश्विनने त्याच्या युट्यूब चॅनेलवर मत मांडताना सांगितलं की, जर रोहित शर्माला काढायचं होतं तर चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर लगेच निर्णय घ्यायला हवा होता. दक्षिण अफ्रिकेत रोहित शर्माच्या अनुभवाची गरज भासेल. जयस्वालची कामगिरी चांगली आहे. पण रोहित अनुभव कामी येईल.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...